Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५०४] श्री. १४ फेब्रुवारी १७६०.
श्रियासह चिरंजीव राजश्री गोविंद दीक्षित यांप्रती वासुदेव दीक्षित अनेक आशीर्वाद उपरि येथील कुशल ता माघ वद्य १३ गुरुवार प्रात:काळ चार घटका दिवस मुक्काम अमदानगर क्षेम असो. विशेष. मोंगलांचा व यांचा सला जाहला. पंचेचाळीस लक्षांची जहागीर, व दोन शहरें व अशेर व दौलताबाद ऐसे किल्ले दोन, बऱ्हाणपूर व औरंगाबाद ऐशीं शहरें, येणेंप्रमाणें ठहराव होऊन सनदा येथें आल्या. आज रात्रौ रा गोपाळराऊ गोविंद फौजेनिशीं दौलताबादेस स्वार होऊन येतील. बहुत काय लिहिणें. हे आशीर्वाद.*
[५०५] श्रीरामजी. ६ जुलै १७६०.
पो श्रावण शुध्द १ सोमवार.
विद्यार्थी तुको कृष्ण कृतानेक साष्टांग नमस्कार वद्य १२ पावेतों सुखरूप असो. खासा स्वारी कर्नाटकास भाद्रपदमासीं जाणार हे वार्ता आहे. हिंदुस्थानाकडील पहिलें वर्तमान होतें कीं : जाटाची खंडणी होते; सांप्रत नजीबखान याजपासून निघोन गेला. जाटही बांधले. हें वर्तमान आहे. पुढें पहावें काय होईल. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ करावा. हे विज्ञापना.