Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
कैलासवासी असतां बावांचें येणें कुलाबास जालें होतें. तेव्हां कर्जाची चर्चा निघाली होती. तेव्हां बावा बोलिलें कीं, आपण चिरंजीव राजश्री जैसिंगास पैके देतों, तुह्मांजवळ मागत नाहीं; त्याजवर खाशांही उत्तर केलें जें, तुमचा टका श्रीचें शिवस्व आहे, तें आपण न ठेवूं ह्मणवून शपथ केला खराच. हे द्रव्याची चर्चा. उपदेश व्यर्थ दिल्याचें उत्तर कीं- बावांनीं मजविशीं काय अर्थ किंवा माझी निष्ठा अथवा आचरण काय चित्तांत आणून मस्तकीं हात ठेविला हें न कळे; मजला सामर्थ्य ऐसें नव्हतें. जे स्वामींनीं कृपाळू होऊन सनाथ करावें. ऐसे ह्मणावें तथापि स्वामींनींच कृपा केली असतां, आतां स्वामी व्यर्थ उपदेश दिल्हा ऐसें चित्तांत कां आणितात ? देणें घेणें ह्मणावें तरी मी त्यांस काय द्यावें ? जें आहे हें त्यांचेंच आहे; इत्यादिक नम्रतेच्या गोष्टी बोलिलों होतों. तो अर्थ त्या पाजीनें एकीकडे ठेवून विपरीतार्थे स्वामीचे सेवेसीं निवेदिलें. बरें ! ते गोष्टीचें काय असे ? तोही येईलच. त्याजवळ मनास आणून, तो येऊन आपण रागास आल्याचा तपशील सांगत होता. त्यास उत्तर लिहिलेप्रमाणें केलें. तेव्हां मजजवळ दहापांच भले माणूस मजालशीस होते. त्याजवर सत्व टाकून मोझा करून, त्या लबाडानें मनस्वी लबाडी जाऊन सांगितली. तेंच स्वामींनीं प्राण मानून शब्द लावून लिहिलें. तर आह्मीं तो बोलिलों नसतां स्वामींनीं बोल लाविला तर स्वामींचा शब्द सूक्त अथवा असूक्त असिला तरी मजला श्रेयस्करच असे. इतकेंच कीं, स्वामींनी ध्यानीं पाहावें होतें कीं, ऐसें भाषण घडेल कीं न घडेल. बाकाजी नाईक यांस कुलाबा नेविलें. तर आह्मीं आलियावर अवघा यख्तियार त्याजवरच टाकिला असतां त्यांस दर्शनाची उत्कंठा होऊन, दर्शनास गेले, फिरोन येथून लिहून व सांगोन पाठविलें; त्यांस आपणांजवळ आणविलें; सर्व कारभार त्यांचेच हातें घेत असतो; कारभार करून नांवरूप करून घ्यावें ऐसें नाहीं; नांवरूप जें होणें तें स्वामीचे पुण्यें व कैलासवासी यांचे प्रतापें होऊन दिगांतीं कीर्ति धन्याची गेली; चिरंजीवाच्या आग्रहास्तव शिक्के करावयाचें मान्य केलें. वरकड पांच हजार रुपये न विचारितां नेल्याचा वृत्तांत:- तर त्यांचा तुमचा ऋणानुबंध अपूर्व नव्हता. संकटास्तव ऐवज नेवावा लागला.