Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १७१
श्रीशंकर
श्रीमत्परमहसादियथोक्तबिदारुकितश्रृगेरीसिव्हासनाधी
श्वरश्रीमत्छकराचार्यान्वयश्रीविद्याशकरभारतीस्वामिकरक
मलसज्याताभिनवश्रीविद्यानरसिव्हभारतीस्वामिकृतनारायपास्मरण
श्रीमत्छकलगुणालकरण हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजेश्री समस्त ब्रह्मवृद व आच्यार्य व जोतिषी व उपाध्ये व धर्माधिकारी व राजमुद्राधारी व समस्त कारकून व देशमुख व देशपाडे व पाटिलकुलकर्णी व समस्त व्यवसाई गृहस्थ वास्तव्य क्षेत्रकराटक सत्सिष्यसिरोमणी या प्रति विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित करवीरक्षेत्री छात्रसभासमवेत श्रीनिकट राहिलो असो तदनतर येथील कुशल जाणोन आपले कल्याण लिहून आशिर्वाद सपादित असणे या नतर मागे आपणास आज्ञा केली होती की एक वेळा क्षेत्रमजकुरी च्यातुर्मास राहवे त्यास दोन वर्षे अवकाष घडून आला नाही प्रस्तुत टाकळी क्षेत्र मजकुरी दोनी मास चातुर्मा(स) राहून पुढे स्वस्थानास जावे हा हेतू चित्तात आणून तुह्यास पुर्वसुचना कळावी ह्या करिता लिहिले असे तरी तुह्मी सर्वानी मिळोन राहवयास स्थलाची अनुकूलता करून ठेवणे वरकड साहित्य तो करोल च परतु अगोदर स्थल योजून नीट करून ठेवणे ह्मणजे दोनी मास कृष्णातीरी वास करू च्यातुर्मास अनुष्ठान सपादू तेणे करता तुह्मास श्रेयस्कर आहे वरकड अर्थ राजेश्री भगवत सिवदेव मु।। सागतील त्या वरून कळेल बहुत काय लिहिणे