Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १४६
श्रीशंकर
श्रीमत्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकरभारती
स्वामिकृतनारायणस्मरणानि
राजमान्य राजश्री नारायणभट गिजरे यासी विशेषस्तु तुमचे कल्याण इछितकरवीरक्षेत्री छात्रसभासमवेत श्रीनिकट राहिलो असो तदनतर सा॥ प्रा॥ पौष्यसित नवमीस श्रीची पुण्यतिथी आहे. या करिता लिहिले असे तरी आपण सहसमुदाय एऊन मोहच्छाव साग केला पाहिजे बहुत काय लिहिणे ये विषइ वडगावास व राजश्री उमाजी गोसावी यासी व मसूरकर व'पालीकर यासी पत्रे लिहून पाठविली आहेत तरी त्यास प्रविष्ट होतील ऐसे केले पाहिजे जाणिजे