लेखांक ४४.

श्री.
नकल.

''करीणा गुणाजी कोंढालकर पाटील मोजे पानवाहन ता। भोर जबानी
राजश्री कान्होजी नाईक जेधे देशमुख ता। मजकूर हे कासारखिंडीच्या जुंझास गेले. ते समई जुंझ जाले. खिंडीतून मोड होऊन तुबकियाच्या वडापावेतो मागे सारिले. ते वेळेस राजश्री नरस प्रभु देसकुलकर्णी यायस जखमा लागल्या. त्याचा आंगठा हाताचा पडिला. तेवेळेस पोसजी कोंढालकर बहुत कामास आला ह्मणऊन देसमुख व देशपांडे मेहरबान होऊन पाटिलकी मौजे पानवाहालची पाटिलकीचा इनाम टके २ दोन पैकी रुके .॥. चोविसाची पाटिलकी दिली. देसमुखानी आपले कानची मोत्याची जोडहि त्याच्या कानांत घातली. हे तिघे भाऊ तपसिल :-

१ वडिल पोसजी कोंढालकर  १ धाकला कावजी कोढालकर
१ या धाकला बापूजी या दोघाचे नकल जाले  
   ता                          ३
१ पोसजीचा लेक   १ वाघोजी कोंढालकर याचा लेक
१ कृष्णाजी याचा लेक गुणाजी  
गुणाजीचे लेक ५
१ वडील बालकोजी १ बापूजी १ मालजी १ सटवाजी १ राणोजी
--------

हे पांढरीमुळे देसमुखीचा व दिवाणचा कर्ज व टका पडिला आपल्यापासेन घेतले.

दुरगाई कोढालकरीण इचे कर्ज रा॥ सर्जराव यानी नागली खंडी ३ घेऊन गलीयास जामीन येणेप्रमाणे दिल्हे

१ बापूजी कोंढालकर  १ मालोजी कोंढालकर १ कृष्णाजी कोंढालकर
   ---------------
 

या तिघानीं दुर्गावास कतबा लेहून देऊन गल्ला नेला. त्यावर सराईत उगऊन घ्यावे तो सराईस मुलकाचा तगाजा, मोगल आला, मुलुक आगदी पळोन वाताहात जाली. बापूजी व मालजी पळोन नेले. त्याचे मागे गुणाजीहि पळोन कोरली पलीकडे आपली माणसे गुरे घेऊन पळोत जात होता. यास बरवाजी कोंढालकर याने कर्जाबद्दल धरून नेऊन येणेप्रमाणें नागवला. रुपये १२०० बाराशाची बेरीज जाली ती यादी आलाहिदा आहे.''

 

समाप्‍त