लेखांक १७.

श्री
१६०० फाल्गुन शुध्द ११

'' स्वस्ति श्री राज्याभिषेकशक ५ कालयुक्त नाम संवत्सरे फाल्गुन शुध एकादसी भोमवासरे क्षत्रियकुलावंतस श्री राजा शिवछत्रपति याणीं राजश्री कोनेरे रुद्र देशाधिकारी प्रांत मावळ यासी आज्ञा ऐसी जे, विठोजी सेलमकर देशमुश गुंजणमावळ याला तपे मजकुरीं इसापत पैकी व हक गेले वरीस तागाईत चालिले आहे तेण्हेप्रमाणे ऐंदाहि चालविले व शिवपट्टणाखाले गोमाजी नाईकाचे सनदेचे जे चालिले आहे तेण्हेप्रमाणे तेहि चालवणे. गेले वरिसीं जे चालिले असेल तें च ऐंदां पाववणे. अधिक उणे न करणे. लेखनालंकार.''
सुरू सुद.

लेखांक १८.

श्री.
१६१० वेशाख शुध्द १४

नकलेची नकल

'' राजश्री रायाजी तोडकरी हवालदार व कारकून किले प्रचंडगड गोसावी यांसी :-

॥ ε अखंडित-लक्ष्मी-अलंकृत-राजमान्य श्नो शंकराजी नारायण सचिव आसिर्वाद नमस्कार सु॥ समिन तिसैन अलफ. राजश्री विसाजी माणकेश्वर मुतालिक सबनिस किले मा।र याणी विनंती केली की, देवपाल व पाल बु॥ व बालवडी या तिन्ही गावरुया सिवार घेरियामध्ये आहे. त्यास गुंजणमावळचे वतनदार कथला करितात. तरी घेराचा निर्वाह करून माहालीच्या वतनदारास आज्ञा केली पाहिजे म्हणून विनंती केली. त्यावरून संताजी सिलीमकर देशमुख व देशकुलकर्णी ता। गुंजणमावळ यासि हुजूर आणऊन व मालोजी इतबारराव सरनाइक घेरा व चाहुजी ना। देवगिरकर घेरा किले मा।र यास आणून, घेराचे वर्तमान मनास आणून हाली हुजरून घेराची हद घातली आहे बि॥ तह राजश्री कैलासवासी स्वामी :-

मौजे पाल बु॥ इनामती देशमुख या
गावीच्या सिवाराची हद ब्राह्मण
खिंडीवरता त्याच्या सुमारे मार्गावरी
गोवडानजिक आंबा आहे, त्या पुढे
आडल्या गवंडाने वंगजाईपावेतो
त्याच्या सुमारें आडल्या गोवंडाने
तांबकड्याचा माथा, त्यापुढें पाच आंबे
गोवंडा खाली आहेत त्याच गोवं-
डाच्या सुमारे भणगवाहळे पावेतो
हद घातली आहे. या बा। खालते रान
माहालाकडे देविले आहे. हदेवरते रान
घेरियाकडे देविले असे. तह १

मौजे देव-पालीचे रान भणंग वाहळे-
पासून दागेराची माठाडी आहे ती
घेरियाकडे देविली. माथा धारेस टोंगराळे
रास आहे ती घेरियांत देविली. तळ
जमीन माहालाकडे देविली आहे. १ मौजे
बलवडीची हद धारेपासून आड व माथा
पाउदमापासून मालंवीर त्यापासून
माहरीके नजिक तलई तेथून पुढे
मिठकणापावेतो हद घातली आहे त्याचे
वरता घेरा त्याखाले उरली जमीन
माहालाकडे दिल्ही आहे. १

एणेप्रमाणें घेराची हद घातली आहे. यावरता घेरा. हदेखालता जमीन महलाकडे दिल्ही आहे, त्याप्रमाणे घेराची चौकसी करणे. येवेसी ता। मा।रच्या देशमुख व देशकुलकर्णी यांसी आलाहिदा आज्ञापत्र सादर केले असे. याउपरी तेहि कथला करणार नाहीत. छ १२ रजब.''