लेखांक १३.
फारसी
१५९० वैशाख शुध्द ४
'' ई कौलनामा राजश्री जिजाबाई साहेब व दामदौलत हू ता। विठोजी हैबतराऊ देसमुख ता। गुंजनमावल बिदानद सु॥ समान सितेन अलफ दादे कौलनामा ऐसा जे, हैबतराऊ व बालाजी नाईक देसमुख ता। मा। यानी कागद लेहून आपला मुदा मकसूल पाठविला जे, आपण आपल्या जिवाचे दहसतीकरिता तोंडें चुकाऊन बाहेर गेले आहे. हाली आपला मुतालिक पाठऊन देऊन त्याच्या हाते देसगतीचे काम घेतलें पाहिजे ह्मणौऊन मुदा र॥ मोरोपंत पेसवे यांपासी लेहून पाठविला. त्यावरून आह्मी त्यासहि कौल पाठविला आहे. ते आपला मुतालिक पाठऊन देतील. तरी तुह्मीहि आपला एक मुतालिक पाठऊन देणे. त्याच्या हातें तुमचें देसगतीचे काम घेऊन तुमचा हक सालाबादप्रमाणे दुमाले करून पेस्तर तुमचा खातीरजमा वाटेल तेव्हा तुह्मीहि सुखी येऊन आपली देसगती चालवणे. आमचे तर्फेनें तुमचे वाईट सर्वथा होणार नाही. हाली आपला मुतालिक पाठऊन देणें. कोण्हेबाबें अनमान न करणे. कौल असे.
फारशा तेरीख २ जिलकाद.''
लेखांक १४.
१५९० वैशाख वद्य ६
''कौलनामे अजरख्तखाने राजश्री शिवाजी राजेसाहेब दामदौलत हू ता। विठोजी सिलंबकर देसमुख ता। गुंजनमावल सुहून सन समान सितैन अलफ बादे कौलनामा एैसाजे, तुमचे बाबे मा। गोमाजी नायक एहीं मालूम केलें, जे, विठोजी सिलंबकर साहेबांचे कौलाचे उमेदवार आहेती; साहेबीं कौल मरहमत केलिया गांवावरी येउनु असतील म्हणून मालूम केले. तरी बिनाबरा मालूमात मनास आणून तुम्हांस कोल मरहमत केला आहे व तुमचेविसीं गोमाजी नाइकाचे डोईवरी हात ठेविला आहे. तुम्हीं कोणेविसीं कांहीं शक न धरितां गांवास येउनु सुखे असणें. कौल असे.''
तेरीख १९ जिलकाद सुरुसुद