लेखांक ५४.
श्री.
१६५० फाल्गून वद्य ९.
'' ε मा। अनाम नारायणजी जुंझारराऊ मरळ देसमुख ता। कानदखोरे यास नारो शंकर सचिव सु॥ सन तिसा अशरैन मया अलफ साखराई मरळीमा तुमची चुलती इने मौजे मसुरे येथील मुकामी आपले वर्तमान विदित केले. त्यावरून तुह्मास सांगावयाचे तें सांगितले. परंतु तुह्मी त्याचे चालवावे, ते चालवीत नाही. ह्मणऊन हुजूर वर्तमान विदित जाले. त्यावरून साखराई मरळ याची तकसीम व इला गावगना इनामतीपैकी तकसीम असेल ते, याचे स्वाधीन करावयाची आज्ञा केली असे. तर करणें. फिरोन बोभाट येऊ न देणे. गाव इनाम व गावगना इनामे असतील, त्याची तकसीम प्रो। देणे. याउपर तिची तकसीन न दिल्ही तर हुजरून मसाला होईल, ऐसे समजोन वर्तणें. छ २२ साबान.''
सुरुसुद.
