लेखांक ३२.
श्री.
१६१८ फाल्गुन शध्द ८.
'' ε मा। अनाम कान्होजी जुंझारराव देसमुख ता। कानदखोरे यासि भिकाजी शंकर आसिर्वाद सु॥ सन सबा तिसैन अलफ मा। सोनाजी जाधव मोघम चाकर रा। याचा सरिक येसजी खरवदकर पाबीयास आहे. तर त्यास वेठ बेगारीच कांहीं तगादा लावीत नव जाणे. सुखरूप राहोन किर्दी मामुरी करी तें करणें. येविसी बोभाट येऊ न देणें. छ ६ जिलकाद.''
लेखांक ३३.
श्री.
१६१९ वैशाख वद्य १३.
'' ε मा। अनाम देशमुख व देशकुलकर्णी ता। मोसेखोरे यासि शंकराजी नारायण सचिव सु॥ सबा तिसैन अलफ संताजी नाईक जाधव ठाणे ता। मा। यानें हुजूर येऊन विदित केलें कीं, ता। मा।री ठाणे नाइकीचें वतन आपलें आहे. ऐसियास आपण चाकरी करीत असतां, त्यास मुशाहिरा व हकलाजिमा न पावावया काय गरज आहे ? हाली हें आज्ञापत्र सादर केलें असे. तरी नफर मजकुरापासून सेवा घेऊन, पेसजी ता। मा।रास आज्ञापत्र सादर आहे. त्याप्रमाणें हकलाजिमा व मुशाहिरा पावित जाणें. छ २६ सवाल पा। हुजूर.''