लेखांक ६

१५३९ कार्तिक वद्य ८.

'' ε ई कौलुनामे अज दिवाण मामले समत तळकोकण हवाले बाजी याकूद इस्तबेली हवालदार त॥ कान्होजी जुंझारराऊ अधिकारी तपे कानदखोरे मामले राईर सु॥ समान असर अलफ बादे कौलुनामा ऐसा जे :- तुमचे बाबें रवळोजी मरळ एउनु मालूम केले जे, कान्होजी मजकुय हुजुरु एउनु आपला मखसूद मालूम करील, ए बाबे तकवेसीचा कौलु मर्‍हामती होए. मालूम जाहाले. बराय मालूमाती खातिरेस आणुनु कौलुनामा सादर केला असे. तू बेसक हौनु देएइजे. तू आपला मकसूद असैल तो मालूम करुनु तुमची दोलतखाई व सरफराजी होईल. कोण्हे बाबे सक मुलाहिजा न धरिजे. पेसजी कारकीर्द एदिलसाही जो गुन्हा केला असेल तो माफ असे. कोण्हे बाबे तालूक आंदेसा न कीजे''

फारसी तेरीख २१ जिलकादी.