१ राघोजी कोढा व त्याचे साहजण भाऊ जमावासुधा पडले. | १ राजजी सण जमावासुधा पडले. |
१ लुखजी नाईक पेटकर खासे असामी ३ व लोक जमावासुधा पडले. |
१ सिदाजी व बालो राऊत देशमुखाचे प्रधान जमावासुधा पडले. |
१ अंतोजी लोहकर व त्याचे भा(ऊ) जमावासुधा पडले. | १ धारराव घोलप नाइकाजवळ सेवेचे बाजेस पळसाचे |
१ ढवले असामी खास नागोजी व जिवाजी व रायाजी व दसरोजी जमावासुधा पडला. |
झाडाखाली बसविले, सबब त्याचे कोण्हीही पडले नाही. |
१ रामजी व पिलाजी तुपा जमावा सुधा पडले. |
१ दस नाहवीयांस जखमा लागोन जेर आला. तो बांद- |
१. वरकड लोक आपलाले जमावा सुधा झाडून पडले. |
लानी नेला. जखमा बर्या करून लावून दिल्हे. |
६ | ४ |
येणेंप्रमाणें लोकांची जुंझांत घरे बुडालीं. गणिती करिता तिनसे माणूस ठार पडले. येके दिवसी तिनसे मुडदे जाले असेत. त्यास जाळावयास घरे मोडून जाती जाती लोक येके जागा जमा करू लागले. तेव्हापासून जेधे व बांदल यांची कटकट वारली. बांदलानीं कजिया सोडिला. सेवेचा व दाईत याचा कजिया साध्य जाला नाही. दाईत दिल्हे नाही. कलम १
भोर तर्फेचे मुळचे चार गाव त्याचे वीस जाले. नावनिसी बितपसिल :-
१ का। भोर | १ चिखलावडे |
१ जानवले | १ न्हावी |
१ वेन्हवडी | १ कारनीट |
१ पामरडी | १ पानवाल |
१ सिरवली | १ अंबवडे |
१ अंबेघर | १ करनवडे |
१ कारी | १ रावडी |
१ म्हाकोसी | १ तिटेघर |
१ वावघर | १ कारले |
१ चिखलगाव | १ वडतोबी'' |