Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४४
श्री १६१७ ज्येष्ठ शुध्द १४
स्वस्ति श्री राज्याभिषेकशके २२ युवनामसवत्छरे जेष्ट शुध चतुर्दशी भृगुवासर क्षत्रियकुलावतस श्रीराजाराम छत्रपती आणि राजश्री तिमाजी यमाजी देशाधिकारी व लेखक वर्तमान व भावी प्रात सातारा यासि आज्ञा केली ऐसी जे माहादजी बिन सुलतानजी जगदळा पाटील देहाय तीन याणे वतनावरी राहोन स्वामिसेवा एकनिष्ठपणे केली व पुढे हि करीत आहे यास्तव याजवरी चदीचे मुकामी स्वामी कृपाळू होऊन यास + + + इनाम जिरात चावर ५ पाच देविले ते समयी माहादजी पाटील याणे विनति केली की स्वामीनी आपणास पाच चावर इनाम देविला त्याजपैकी कसबा मसुरामध्ये देवस्थान आहे त्यास काही व कसबे मजकुरीचे वतनदारास काही व खासा आपणास काही ऐसे वाटून देविले पाहिजे अव्वल दुम सीम बितपसील
देवस्थान कसबा मसूर श्रीजटाशंकर व श्रीभवानी यासि राजश्री कैलासवासी स्वामीनीं पुजाउछाहास पूर्वी मोईन करून दिल्ही आहे तेणेप्रमाणे हा काल पावेतो चालत आहे त्याखेरीज साप्रत जाजती भूमी बिघे .।१०
एकूण पाच चावर सदर्हूप्रमाणे देविलीयाने वतनावरी स्वामिसेवा करून सुखरूप असोन ह्मणौन विनति केली त्याजवरून पाटिलमजकुरावरी स्वामी सतोषी होऊन सदर्हूप्रमाणे नावनिसीवार इनाम भूमी चावर ५ पाच रास कुलबाब कुलकानू देखील हालीपट्टी व पेस्तरपट्टी खेरीज हक्कदार करून विसा पाडाच्या बिघियाने भूमि इनाम दिल्हा असे तर याचे स्वाधीन करून यासि व याच्या पुत्रपौत्रादिवशपरपरेने व देवस्थानास उत्तरोत्तर चालवणे प्रतिवर्षी नवीन पत्राची अपेक्षा न करणे या पत्राची प्रति लेहून घेऊन मुख्य पत्र पाटिलमजकुरापासी परतोन देणे जाणिजे निदेश समक्ष