Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४२७
श्रीशंकरप्रसन्न
राजमान्य राजश्री नारोपंत स्वामीचे सेवेसी
सेवक गुडाजी नाईक नमस्कार विनंति उपरि तुह्मी सारवोरोजी बराबरी पत्र पाठविले ते पावले लिहिले की सालगुदस्ता बा। ११॥. यास रा। गोविंदराऊ याकडे ५॥ व अह्माकडे ६ चावर ह्मणौऊन लिहिता तरी आबाघरी बाइका जाऊन बसले आहे त्यास तुह्मी जाउनी वाटू (न) घेऊन टाकणे व तुह्माकडे जे लागल ते धान चोख व दाविले धारण जो पैका होईल तो व त्याजकडे जो होईल तो लिगाड निर्गमून टाकणे वशगती बा। व्याज कोलगे ५०० त्याचा पैका व षेपेजरीच धान १८॥२ बाकमी राहिले आहे ते त्याचा लिगाड तुह्मी गोविंदरायापावेतो अपाजी बराबरी जाऊनि वाटूण घेण व धानाचे विशई लिहिले तरी आधी आह्मास देऊन मग कोनास तरी देण आह्मास ने देता आनरवी कोनास द्याल तरी मग तुह्मासी बोलानार नाही धान चोखड व पांढरे जितक असल तितक आह्मास देऊन मग आनी कोनास देण गोविंदरायापावतो जाऊन येऊन हिसब न ठेवणे आलस न करणे हे विनंती आवंदा तुह्मी जाऊन हे लिगाड लावले आलस करून राहाविता तरी तुह्मास आह्मास निस्टूर होईल तुह्माकरिता आह्मास व गोविंदराउयास काही निठूर करणे नाही तुह्मापासून हे लिगाड घेऊन सोडणे ह्मणौऊन गोविंदरायान सागितल याउपरी आलस कराल तरी किचाटास पात्र तुह्मी व स्नेहास अतर तुह्माकटून पडलेस होईल यासत्व१ तुह्मी गोविंदरायापावेतो जाऊन हे लिगाड वारून माहागाचे धारनेने पैका जो होईल त्याच आताचे धारणेने पैका आगर धान जे द्याल ते घेऊन याउपरि आह्मी निठूरतेने लिहिले ह्मणौऊन राग न मानने तुमचे बरियासाठी सागता देशकाल येक प्रकार लिगाडच कामा येऊ नये यासत्व१ लिहिले आहे कृपा असो ढीजे हे विनंती