Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३०७
जाला महजर ऐसा जे दादाजी नरस प्रभु देशकुलकर्णी व गाउकुलकर्णी ता। भोर व ता। उत्रोली दुतर्फा किलेमजकूर व ता। वेलवंडखोरे याचा व बाबाजी सिवदेऊ सोनटके कारकून लिहिणार नि॥ दादाजी नरस प्रभु देशकुलकर्णी गाउकुलकर्णी ता। मजकूर या हरदोजणामध्ये गरगसा होऊन ता। मजकूरची विलायत खराब जाली हरदोजणाचा गरगसा होण्याचे कारण जे बाबाजी सिवदेऊ याणी मतलबानी खोटाई करून ता। उत्रोलीचे देशकुलकर्णाचे वतन आपल्यास असावे जे ध्यानी देशमुखी पेशजी खोपडे यापासून निमे घेतली त्याप्रमाणे गरगसा आपण केला असता आपणास हि वतन मिळेल याजकरिता उत्रोली तर्फेचे देशकुलकर्ण आपले ह्मणून कोठे कोठे महजरावर खोटाईने बिकलम घालून गरगसा माडला याजमुळे दादाजी नरस प्रभु देशकुलकर्णी गाउकुलकर्णी ता। मजकूर याणी फिर्याद वजारतमाह सीवाजीराजे फरजद शाहाजीराजे व हमशाही देशमुख व मावळानिहाये या हुजूर उभा राहिला आणि बोलिला जे माझे वतन सदरहू माहालचे असता बाबाजी सिवदेऊ माझा चाकार खोटाईने आपले देशकुलकर्ण उत्रोली तर्फेचे ह्मणून कोठे कोठे बिकलम आपले घातले आहे त्यास त्याजला आणून चौकसी करून त्याजपाशी खोटपत्र घेऊन माझे वतन मजला बाहाल करून दिल्हे पाहिजे त्याजवरून बाबाजी सिवदेव यास राजे मशारनिले यानी नेऊन चौकसी केली तो दाद प्रभुचे वतन असता बाबाजीने खोटाईने बिकलम घातले हे लागू जाल्यावरून त्याजपासून खोटपत्र राजे यानी लिहून घेऊन हरदुजणा दाद प्रभूस किले मजकुरी पाठविले जे दाद प्रभु हा नरस प्रभु याचा फरजद त्याचे गोत्र पुरुशगुप्त भनजी प्रभु धाकटे भाऊ याचा ++ बेलवडखोरियातून पेशजी सिरवलास नगराणा लाऊन दोन्ही वतनास आधिकारी करून नरस प्रभु हा भानजी देशपांडे चे भाउ सबब फरजद देशकाचे वकील मजकूरचे साक्षीने पेशजी जाला त्याचे कागद दखल जाले दादाजी नरस प्रभु दोन्ही खोरियाचा वतनदार खरा बाबाजी सिवदेऊ खोटा जाला येविसीची चौकसी राजे याणी हि केली वकील मजकुरी हि देसक मेलऊन चौकसी पाहिली तो दादाजी नरस प्रभु देसकुलकर्णी गावकुलकर्णी दुतर्फा किलेमजकूर ता। वेलवडखोरे येथील वतनदार मलिक +++++ कारकिर्दीपासून व पेशजीपासून नरस प्रभूचा फरजद ठरून वतन अनुभवी +++++ जावे तेणेप्रमाणे मनास ++++++++ यास महजर करून दिल्हा असे ++++++++++++++ महजर तारीख २५ जिलकाद बिहुजूर हजीरमजालसी किले रोहिडा +++++ सलास खमसैन अलफ
→पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा