Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २८३
श्री १६१२ वैशाख शुध्द ९
सिका राजाराम साहेब नकल
(सिका प्रधान) (सिका प्रतिनिधी)
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके १६ प्रमोद संवत्सर वैशाख शु॥ ९ नवमी इंदुवासर मा। बाजी सर्जाराव जेधे देशमुख व देशकुलकर्णी ता। भोर तपे रोहिडखोरे यासि राजाज्ञा केली ऐसिजे तुमचेविसी नाइकजी जेधे दि॥ देसाई हुजूर येऊन विनती केली की आपला वतनाचा हकलाजिमा इनाम व इसाफति आपले गाव कारकीर्द आलिशाईपावेतो चालत होते त्यावर काही साहेबाचे कारकिर्दीस बटाईचा तह जाला त्यामुळे आपले इसाफतीचे गावचा राजभाग गला दिवाणात पाउनु हाकाची मोईन दिवाणातून करून दिधली तेणेकरून आपली हैरानगी जाली अन्नवस्त्राची ते हि विप्ती जाली औरंगजेब स्वामीच्या राज्यावरी चाल केली राजश्री छत्रपति स्वामी रायगडीहून कर्नाटक प्राती गेले रायगड व वरकड हि किले कोट गनिमाने घेतले मुलकाची अवकात चालले नाहीत येगोष्टीनी गनिमासी सामील होऊन फिसाती केल्या त्याबरोबरी आपणासी हि दिल्हे वरतावे ऐसे जाले परतु आपण स्वामीच्या पायासी एकनिष्ठेने वरतावे हा चि निश्चय करून होतो स्वामी कर्नाटक प्रा। गेलियावरी तिकडे विजयी लोक आपण वतनदार लोक एकनिष्ठ सेवा करून दाखवावी ह्मणून किले विचित्रगड गनिमापासून घेतला व देश हि सोडविला पुढे हि जमाव करून गड कोट व देस गनिमापासून घेतो परतु स्वामीनी कृपाळू होऊन पेशजी आपला हक चालत होता तेणेप्रमाणे देखील इसाफतीचे गाव चालविले पाहिजे तर्फमजकूरची लावणीसचणी करून स्वामिसेवा एकनिष्ठपणे करू ह्मणऊन विदित केले त्यावरून आमचा हक व इनाम व इसाफतीचे गाव तुह्मास देविले आहेत पेशजी कारकीर्द प्रो। घेत जाणे तर्फमजकूरची लावणीसचणी करून दस्त आकारून सदरहूप्रमाणे घेत जाणे तर्फमजकूरचे गाव लावणी करून दस्त आकार होत जाईल त्याप्रमाणे लागल्या दस्तावरी हकाची मोईन बैसउनु घेत जाणे छ ५ साबान सु॥ तिसैन अलफ आज्ञा प्रमाण मोर्तब असे
(सदरहू आज्ञापत्र किले विचित्रगडचे मु॥ आषाढ वा। १३ स पावले असल पत्र देशमुख याजपासी देऊन नकल दाखल्यास घेऊन ठेविली आहे देसाई कारीस गेले ह्मणउनु काट्या व मानकर व नाइकजी जेधे याचे हाते पाठविले)*