Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

                                                                                   लेखांक २५८

                       तेथे सदानंद पादुका मठ आहे                                                                             दस नामकि छाप

5 श्री त्र्यंबकराव नीळपर्वनिवासी दस नाम सन्यासी लेहावया कारण ऐसा जे देसाई व देशकुळकरणी व मोकादम व समस्त ग्रहस्त मौजे निंब पा। वाई समस्तास आसीर्वाद उपरी तेथे मठाची व पादुका आहे त्याची लजा तुह्मास आहे ते स्थली तुह्मी भले आहा तरी पाच जण मिळोनु त्याचा प्रतिपाळ करणे जो कोण्ही जो वैरागी मठात राहेत त्यास मठांत ठेवणे जो संयोगी होय त्यास मठात राहो नेदणें मठाचे बाहे राहेल व मठासी दावा न करे वैरागी कोई न हो व जगनाथ बालक आहे हा भला आहे तरी तुमचा चित्तास मानत असेल तरी याचे संस्थापन करणे याचा साभाळ कराल तो आह्मास पावेल कमळनयन तुमचे वडिली बैसविला हा कालपर्यंत तुह्मीं चालविलें पुढें ही याचा प्रतिपाळ करणे हे तुमचे यश आहे बहुत लेहणे नलगे तुह्मी भले आहा या कारणे तुह्मास लिहिले आहे जागाची प्रतिष्ठा राहेल ते करणे व दताजी नाइक देशमुख ॥ आशीर्वाद तेथे मठात जगनाथ बरवा आपले स्वधर्म रक्षून असेल तरी याचे बरवे चालवणे याची कोण्ही खास्ती करील त्यास तुह्मी ताकीद करणे मठ तुमचा आहे याची पाठी राखोनु मठाचे संरक्षण करणे तुह्मी देसाई आहेस व मिरासी आहे व भला आहेस याजकारणे मागुत्याने दुबारा तुह्मास लेहिले आहे जगनाथगिरीचा बहुत सांभाळ करणे याची खास्ती करील त्यास ताकीद करणे येविशी आमची आज्ञा आहे यास जतन करणे हे आशीर्वाद