Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १७९
श्री १६२१ आश्विन वद्य ५
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २६ प्रमाथीनाम संवत्सरे आश्विन बहुल पचमी भोमवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजाराम छत्रपती याणी राजश्री तिमाजी यमाजी देशाधिकारी पा। सातारा यासि आज्ञा केली ऐसी जे सदानंद गोसावी याणी हुजूर येऊन विदित केले की आपला मठ मौजे निंब प्रांत वाई येथे आहे त्यास पुर्वापार इनाम आहे बितपसील जमीन बिघे
निगडी पवाराची येथे बिघे १५ वरीयेपैकी बिघे ५
मौजे सेदरे पैकी बिघे ५ मौजे वेचले पैकी बिघे ५
येणेप्रमाणे तीस बिघे जमीन पुर्वापर अदलशाहाचे कारकीर्दीपासून इनाम चालत आहे आलाकडे धामधुमीच्या प्रसंगाकरिता बिलाकुसूर इनाम चालत नाही तरी स्वामीने आज्ञा करून सदरहू इनाम बिलाकुसूर चाले ऐसी गोष्ट केली पाहिजे ह्मणून विदित केले त्यावरून हे आज्ञापत्र सादर केले असे तरी तुह्मी हे जाणून सदरहू इनाम गोसावी याच्या मठास अदलशाहाचे कारकीर्दीस चालत आला असेल त्याप्रमाणे हाली पडजमीन याचे स्वाधीन करून इनाम बिलाकुसूर चालवणे या पत्राची प्रती लिहून घेऊन मुख्य पत्र गोसावीयाजवळी परतोन देणे जाणिजे लेखनालंकार
रुजू सुरनिवीस