Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १६२
श्री १६१८ माघ वद्य १३
श्रीमत् तपोनिधी राजश्री भवानगिरी बावा गोसावी यासि स्नेहाकित परशराम त्र्यंबक नमो नारायण उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन केले पाहिजे यानंतर तुह्मी पत्र पाठविले ते पावले लि॥ वृत्त कळो आले गावाचे विशी राजश्री स्वामीचे पत्र पाठविले पाहिजे ह्मणून लि॥ व त्रिंबकपंताबा। जबान सांगोन पाठविले ते त्याणी सांगितले त्यावरून पत्र राजश्रीचे पाठविले आहे तें घेतलें पाहिजे आपल्या कार्यास आह्मापासून अतर पडणार नाही कळले पाहिजे छ २६ रजब