Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ७९
१५३० श्रावण वद्य ७
(शिक्का) (फारसी मजकूर)
अज रखतखाने खुदायवत खान अलीशान खा। अजम रणदुलाखान खुलीदयामदौलतहू बजानेबु कारकुनानि हाल व इस्तकबाल व देसमुखानि पा। वाई बिदानद सु॥ तिसा सलासैन अलफ जोगिंदरगिरी मठ सदानद सा। मोजे नीब पा। मा। हुजूर येउनु मालूम केले जे मठ बा। कमलनयनगीर मानभाव याही समाधी घेतली ते वखती आपले हवाला मठ व इनाम केला + रु मोकदमा व कुलकर्णी व सेटे माहाजन बाजे लोक मौजे नीब त्यावरी मठ व इनाम आपले हवाला असे गरीबगुरुब फकीर जे येतील त्यास अनउदक देऊन असे ऐसे सालबसाल चालत आले आहे हाली हिगुलगिरी मानभाव येउनु हरकती करून आपणास बाहीर घातले आहे याबद्दल साहेबानजीक आलो आहे नजर एनायत फर्माउनु सरजामी करून खुर्दखत मर्हामती केले पाहिजे ह्मणउनु मालूम केले तरी मठ व इनाम जे असेल तो जोगिंदरगिरीच्या हवाला गेला आहे दुमाला कीजे जोगिंदरगिरीस कमलनयनगिरी मानभाव सादूयास कागद लिहून दीधला आहे आणि हिगुलगिरी मानभाव येऊन हरकती करून यास बाहीर घालावयास त्यास काय निसबती आहे आता ऐस न कीजे जोगीदरगिरीचे हवाला मठ व इनाम दुमाला केले असे त्यासि काही इलाखा नाही मठ व इनाम जोगिंदरगिरीच्या हवाला केल असे दुमाला कीजे पा। खा। अफजलखान तालीक घेउनु असल फिराउनु दीजे जो कोण्ही लायणी हरकती करितो त्यास ताकीद करून बाहीर घालणे मोर्तब पहिले हवाले केले आहे त्या खुर्दखताप्रमाणे दुमाले कीजे मो (शिक्का)
रुजु सबनिवीस रुजु दफतरखास रुजु शुरुनिवीस
तेरीख २० माहे रबिलाखर
रबिलाखर बार सूदु