Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ७०
श्रीगणराज
विनंति उपरि हैदरनाइकावर जरब श्रीमंताची जबरी बसली त्याची गुर्मी कांही वल्गना करीत होता तेणेंप्रमाणें राहिली नाहीं त्याच्या लोकानीं दम टाकोन पलायन करूं लागले शिलेदार कानडे गाडदी चटेकार ऐसें पायदळ आदिकरून नित्यानीं गच्छंती करीत आहेत मैदानरानांत अवसान न पुरवे यास्तव झाडींत गेला तेथें जावें तर हे दिवस पर्जन्यकाळाचे त्यांत नित्यानी पर्जन्य लागतो लष्करांत पोटास नाहीं दाणावैरणीचा तोटा घोडीं अगदीं पडीस आलीं मेहनत करावयाचे दिवस चिकोडी मनोळी येथें दिवस घालविले अखेरीस येथें आले तरतूद कांहीं च नाहीं शत्रूवर जरब ही बसावयासीं कारण श्रीमंताचे पुण्य बाकीं ऐवज कळत च आहे. कांहीं राजकारणाचे अंत्र बापूस सखाजी नि।। अबा पुरंधरे याचे विद्यमानें आहे बर करून बळावले तर तह करून माघोर येणार नाहींतर परिछिन्न छावणी करून राहणार मान्या कारंजकरी यानीं तों नेट धरिलें आहे आठपंधरा दिवस अवकाश हि आहे इतक्यांत सर्व विचार कळतो तदनुरूप लिहून हि पाठवून देऊं ऐवजाकरितां राजश्री जयरामपंतास आपण पाठविलें त्यास मशारनिलेस आपली निकड जाणोन च ठेऊन घेतलें महिनापंधरा दिवशीं कळेल तेणेंप्रमाणें तरतूद करून ओढींत वोढ समजोन कांही ऐवज पाठवून देऊं आपल्या पागेचे रामाजीपंत दारूनें कळोन मृत्य पावला वरकड वर्तमान मशारनिले लिहितां सर्व विदित होईल तुम्ही श्रीमंतांजवळ आहां तेथील वर्तमान काय उत्तरेकडील प्रकार कसा सांप्रत नवीन पुरंधरचे जाहालें त्याचा विचार काय हा तपशीलवार लिहोन पाठवून देणें या रानी रोग फार आला त्याजमुळें घोडें थकलें तुमचे पागेचीं घोडीं लहानथोर पांचसांत राहिली रा। जयरामपंतास पागेंत ठेऊन घेऊन नंदमबस्तीस लाविले आहेत जगत्पित्याचे मातुलास साष्टांग नमस्कार प्रविष्ट करणें लोभ असो दीजे हे विनंति समस्त मंडळीस साष्टांगनमस्कार लोभ कीजे हे विनंति