Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक १९
श्री भाद्रपद वा। १२ शके १७२१
दस्तक राजश्री रामचंद्र शिवाजी ता। चौकीदारान व रहदारान व बाजेलोकान व जकातीमहालान व नावाडीपेठेकरीयान व मोकदमान देहाय सु।। मया तैन व अलफ राजश्री गोविंदराव नीलकंठ यांची पागा किल्लेसोलापुरीं चारणीस आहे त्यापैकीं घोड्या तीन व तट्टें चार एकूण रास ७ सात पुण्यास जात आहेत समागमें राणू खासबारदार व पोर्गे वगैरे माणसें आहेत हीं जातील त्यांस मार्गी जकातीविशीं वगैरे हरएकविशीं उपसर्ग न करितां जाऊं देणें वस्तीस राहातील तेथें चौकीपहारा करून नदी नाला वगैरे आपलाली हद्द पार करून देत जाणें जाणिजे छ २५ रविलाखर मोर्तबसुद