Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)

                                                                                             पत्रांक ८०.

इ. स. १७६४ मे                                                                  श्री                                                              १६८६ वैशाख.


राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसिः-
सेवक माधराव बल्लाळ प्रधान. नमस्कार. उपरी. एथील कुशल जाणून स्वकीय लिहिणे. विशेष. तुह्मां-कडून अलीकडे पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी प्रस्तुत तीर्थस्वरूप राजश्री दादासाहेबांची मर्जी कशी आहे ? शरीर-प्रकृति कशी ? अवषध कोणाचें घेतात ? हें लिहिणें. मोंगला-कडून हिम्मतखान आले होते त्यांसी सलुखाचें बोलणे कसें जाहलें ? हिम्मतखानाचा भाव कसा आहे? सलुख जाहला हा किती दिवस चालेल ? हा प्रकार व त्याचा बोलण्याचा आशय कांहींच कळत नाहीं. जी दिल्ही जागीर ती घ्यावी आणि पुढें नीट चालावें हा आशय नबाबाचा व त्याचे कारभा-याचा कसा आहे ? हें लिहिणे. वरकड वर्तमान मल्हारबाकडील व शिंद्याकडील लिहून हमेशा पा। जाणें. वरकड वर्तमान बारिक मोठें हमेशा लिहिणें. इकडील वर्तमान तर सविस्तर तीर्थस्वरूपांचे पत्रीं पूर्वी लिहून पाठविलें आहे त्यावरून कळेल. प्रस्तुत हैदरनाईक मायन-हळीस गेला आहे तेथें एक दोन मु॥ होईलसें दिसतें. त्याचें मानस हेंच की ‘चार दिवस घालवावे. हे छावणीस रहात नाहींत. हें त्याचें मत आहे.’ झाडी सोडून झुंजायास यावयाचा प्रकार दिसत नाहीं. रात्रीस छापा घालावा हे इच्छा धरीत आहे. दुसरा प्रकार तर किमपि दिसत नाहीं. नबाबाकडेहि पत्रें पाठवित आहे, कीं, “तुह्मीं यावे.' हाही प्रकार करितच आहे. नबाबही काडळूर संगमावर येणार आहे. पुढें पहावें. याचें त्याचें कसें आहे हें नकळे. याचें पारपत्याचा मजकूर तर प्रस्तुत तो झाडीत आहे. पर्जन्य बहूत, म्रहरगता विशेष, असा प्रकार आहे. च्यार रुपये मिळवावे ते दिवस मागेंच गेले. प्रस्तुत एवजाचा प्रकार कोठेंहि दिसत नाहीं. असा प्रकार आहे. याचें पारपत्य जाहल्या खेरीज यावयाचें कसें ठीक पडतें? तोही आपले छावणीची वाट पाहात आहे. त्याचेहि लोक फुटतात व राजकारणें एतात. परंतु आपले फौजेस रोज-म-यास ठिकाण नाहीं तेव्हां ते कसे येतात? हे सर्व अर्थ वडिलांस विदित करणें. आपले*