Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ७०.
१७७१ ता. ३ सप्तंबर श्री. १६९३ श्रावण वद्य ९
राजश्री विसाजी कृष्ण गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्ने। हरकूबाई होळकर दंडवत. सु।। इसन्ने सबैन मया व अलफ. तुम्हीं पत्र पाठविले ते पावलें. हरी-रामभवानीदास याजकडील ऐवजाचा मजकूर लिहिला त्यास मशारनिले तुम्हांपासी शिरपुरास आले आहे ( त ) तुह्मीं (व) ते समजाऊन पुरशा (फडच्या ?) करोन घेणे. आह्मांस दर घडी वारंवार लिहितां, याचें कारण काय ? आम्हीं कांहीं जामिन नाहीं. जामिन-रोखाही तुह्मांस दिल्हा नाहीं. तुमचे माणसांस पुसावें. ताकीद करोन तुम्हांकडे पा। आहे. पुरशी (फडच्या ?) करोन घेणें जाणिजे. छ २३ जमादिलावल बहुत काय लिहिणें ? ।