Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ६०.
१६४१ आषाढ शुद्ध ५.
स्वस्तिश्री राज्याभिषेक - शके ४६ विकारी संवत्सरे आषाढ शुद्ध ५ पंचमी गुरुवासर. क्षत्रियकुळावतंस श्रीराजा शाहू छत्रपति स्वामी याणीं तपोनिधी वल्लभगीर गोसावी यांसि :- दिल्हे इनामपत्र ऐसी जे
तुह्मी हरिभक्तपरायण तपोनिधि तुमचे मठीं अतीतअभ्यागत येत असतात. त्यास अन्नपाणी पावल्याने स्वामीस व स्वामीच्या राज्यास कल्याण, ऐसे जाणोन, स्वामी तुह्मांवर कृपाळू होऊन मौजे आंबवली तो मुठेंखोर प्रां। मावळ, हा गांव पेशजीच्या मोकासियाकडून दूर करून, हाली कुलबाब कुलकानू खेरीज इनामदार व हक्कदार, चतु:सीमापूर्वक करून दिल्हा असे. तरी मौजे मार आपले दुमाला करून घेऊन तुह्मीं व तुमचे शिष्यपरंपरेनें इनाम अनभऊन सुखरूप राहणें. जाणिजे.
लेखनालंकार मोर्तब.
बार सूद. बारसुरुसूद. बार सुमंत. बार मंत्री.