Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २८७.
१६९७ पौष.
र॥. चिंतो विठ्ठल यांजकडे बातमीकरितां माणसें पाठविलीं होतीं त्यांतून एक माणूस त्यांनी आपलेजवळ ठेवून घेतला ते सासवडानजीक आणि एक माणसासमागमें निरोप सांगोन पाठविले कीं माचीवाल्यांनीं बंगालेवाल्यास समजाविलें कीं हा मूल जो आहे हा वडील घरचा टिक्याचा खावंद आहे. श्रीमंतास पेशवाईचा संबंध नाहीं. त्यावरून येथें आपठण आलियावर आपटणानें म्हटलें कीं मूल तरी लहान दौलत चालवावयास योग्य श्रीमंत दादासाहेब ते आहेत. थोर कृतकर्मे... हजर आहेत ते दौलत करितील. बारभाईंनीं उत्तर केलें कीं त्यांनी नारायणारायास चांगले न पाहिलें ते या मुलास व आह्मांस चांगले काय पहातील याची पाठ आह्मी घेतली याची मुलूक घेऊन असावें राज्याची गोष्ट तो घडणार नाहीं त्यांसी गुजराथेचा मुलूख देतों तेथें त्यांनी असावें. किल्ला देणार नाहीं. किल्ला दिल्यानें खूळ करितील. थोरले श्रीमंताचा व इंग्रजाचा पूर्वीपासोन स्नेह तो एकीकडे ठेवून इंग्रजांनी साष्टी वगैरे किल्ले घेतले हे नीत की काय ? तेव्हां आपटणानें उत्तर केलें की साष्टी वगैरे घेतली ही गोष्ट आह्मीं चुकलों तुमची माघारी तुह्मांस देतों. त्यासंबंधें जो खर्च लागला असेल तो तुह्मी द्यावा. बारभाईंनी कबूल केले कीं साष्टीचा खर्च माघारा देतो साष्टी द्यावी व चंदावरचें राज्य आमचें भोसल्याचें आहे तें सोडावें तेथील राजा कैदेस घातला आहे तो सोडावा. श्रीमंताचा पक्ष करूं नये. ते व आह्मी समजोन घेऊं हा उत्तम पक्ष. मसलतसंबंधें जो खर्च मागतां तो ही देऊं बखारीस जागा पुण्यांत मागतां ती देऊं याप्रमाणें कबूल जाहालें. त्याविषयीचा मजकूर बोलावयाकरितां दोन इंग्रज मुंबईस पाठविले आहेत. तेथेंच निश्चय ठरणे तो ठरेल. निदान गुजराथ खेरीज किल्ले देऊं याप्रमाणें ठरोन मुंबईस इंग्रज पाठविले आहेत. आपटणाचे म्हणणें मुंबईवाले चुकले असले तरी चाकरीवरून दूर करूं याप्रमाणें येथील मजकूर आहे. आपटणाच्या भेटी व माचीवाल्याच्या दोन वेळा जाहल्या. आपटणाकडे निरोपी माधवराव जाधवराई केले आहेत ते निरोप सांगतात त्याचे ऐकोन येतात याप्रमाणें जाहलें आहे. श्रीमंताचें मतें आह्मीं या कूटांत आहों परंतु आह्मांस येथें कोणी पुसत नाही ज्या कालीं अनीनीस अनीन लागेल त्या कालीं जितकें आमच्यानें घेऊन ठेवितील तितके घेऊन ठेवूं. आतांच निघोन यावें तरी श्रीमंताचा पक्ष इंग्रज सोडत नाहीं ऐसा तरी निश्चय कोठे आहे ? तथापि यावें तरी तूर्तच मुलालेकरांस प्रतिबंध होणार तेथें राजश्री सखाराम बापूचे मनांत श्रीमंत नसावे ऐसे नाहीं परंतु पुण्यांत कामाचे नाहीत येथे असल्याने आपणास दगा करितील. बाहेर मुलूख घेऊन असावें परंतु हरएक प्रकारे सलूख करून बखेडा तोडावा ऐसें मानस आहे. भगवंतराव प्रतिनिधीची उभारणी बापूंनीच केली. नाना फडणीसाचें लक्ष भगवानरायाकडे सर्वात्मने. त्याचे कुमकेस फौज पाठवावयास नानांनीं योजिली होती परंतु बापूनें मना केली. या उभयतांचें अंतर्याम शुद्ध नाहीं. बाह्यरंग एक आहे. माचीवाल्याचें ह्मणणें की याप्रमाणें सलूख होत असला तर उत्तम नाहीं तरी आह्मी युध्दास सिद्ध आहों. मसलतीचा खर्च व साष्टीचा खर्च देऊ ह्मणतां व बखारीस जागा वगैरे आमची कामें तुह्मी करून देणार त्यास कबूल आह. परंतु तुह्मीं श्रीमंतास हाती द्या ह्मणाल तर आह्मी देणार नाहीं. गुजराथचे पार करून देऊं मग तुह्मीं व ते समजोन घेणें. श्रीमंतांनीं गुजराथेवर ऐकलें तरी उत्तम जाहलें. न ऐकलें तरी याप्रमाणें तुह्मी आह्मांस देणें ह्मणजे आह्मी मुंबईवाल्यांस सांगोन श्रीमंतास गुजराथेवर समजावितों. मुंबईवाल्याचे वोढून धरिलें तरी मुंबईवाल्यास चाकरीवरून दूर करूं. मुंबईवाल्यांनी ऐकिलें आणि श्रीमंतांनी न ऐकिलें तरी गुजराथ पार करून देऊं वडील घरचा मूल ह्मणतां तरी तीन पिढ्या नाना माधवराव व हा मूल तीन पिढ्या दौलत केली हे बाजीराव याचे पुत्र असतां मुलास दौलत द्यावी हें ठीक नाहीं दादासाहेबच योग्य आहेत.