Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २००.
१७०० मार्गशीर्ष वद्य १०.
(श्रीसांब : सुपत्रो विजयते राजा शाहु नरपति हर्षनिधान रघुनाथ बाजीराव मुख्य प्रधान.)
राजमान्य राजश्री सदासिव धोंडदेव यांसि :-
रघुनाथ बाजीराव प्रधान नमस्कार. सु॥ तिसा सबैन मया व अलफ. तुह्मीं विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट जालें.
फकिराचा मजकूर लिहिला. त्यास, खासा स्वारी तेथे असतां त्यांस खर्चासही दिल्हेंच आहे. हालीं ते दूध मागत असल्यास देत जाणें. कलम १.
दाहा कामाठ्यांची नेमणूक होती, त्यापैकी पांच तेथें आहेत ह्मणून लि॥. त्यास, महादाजी मोरेश्वर, कामाठयांकडील कारकून, यास ताकीद केली त्याजवरून त्यांणी अर्ज केला कीं, कल्याणाहून दुसरे पांच कामाठी र॥ केले आहेत. ते पावले न पावले तें लिहिणें.
दाहापैकी कमी असल्यास भरती करून ठेवणें. कलम १.
घोड्याचा पोरगा होता तो पळून गेला, त्यास दुसरा पाठवावा, ह्मणोन लिहिलें. त्याजवरून हुजुरून माहार पोरगा पाठविला असे.
माहादेवभट ठेविला होता तो घरीं गेला, ह्मणून लिहिलें ते कळलें. त्यास, त्याचे ऐवजीं दुसरा ब्राह्मण तुह्मी ठेवणें. कलम १.
कल्याणास आरसे वगैरे जिनस आहे, तो यादीब॥ मुंबई नेऊन फरोख्त करावयाविसीं लक्ष्मण बापूजी कारकून ठेविला आहे. तो मुंबईस जिन्नस घेऊन येईल. त्यास, तुह्मीं व त्रिंबक पांडुरंग व भास्कर भिमाजी व कारकून मिळोन यादीप्रमाणें जिन्नस फरोख्त करणें.
त्रिंबक पांडुरंग व भास्कर भिमाजी व तुह्मीं तेथें आहां. त्यास, खासा स्वारी इकडें आल्यावर जनराल इकडील काय मजकूर बोलत असतात व विलायतेकडील व बंगाला व मदराज सुरत येथील नवल विशेष वर्तमान आढळेल तें लिहून तुह्मी त्रिवर्ग पाठवीत जाणे.
येकूण कलमें साहा. छ २३ जिलकाद.
आज्ञा प्रमाण.
(लेखनावधि:)
पो। छ २५ जिलकाद,
संध्याकाल.