Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ४६९

श्री १९१७ भाद्रपद शुद्ध १०


राजश्री सदाशीव भाईजी व बाबाजी आबाजी कामगारी पो आंबड गोसावी यांस:-

स्ने।। मल्हारराव होळकर दंडवत सु।। समान तिसैन मया व अल्लफ, का।। व्याहामांडवे व मौजे गोंदी पो मजकूर हे दोन्हीं गांव राजश्री दादाजी गंगाधर यांजकडे आहेत. तेथें तुह्मीं स्वारप्यादे पाठवून, नख्त ऐवज व खर्चवेंच वगैरे मनस्वी पैका घेतला, ह्मणून विदित जाहलें. त्यास, मारनिल्हे सरकार उपयोगी. यांचें अगत्य जाणून, यांजकडील गांवास उपद्रव न व्हावा, येविशी पेशजीं दोनतीन पत्रें सादर जाले असतां, मागती दंगा करितां हें नीट नाही. त्यास हालीं पत्र पावतांच, याजकडील गांवाकडून नख्त ऐवज व खर्चवेंच घेतला असेल तो दरोबस्त ऐवज माघारी देऊन, पुन्हां उपद्रव न देणें. जाणिजे. छ ८ रो।।वल. बहुत काय लिहिणें ? मोर्तबसुद.