Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३९६
श्री १७१७
राजश्रियी विराजित राजमान्य राजश्री बाबूराव स्वामीचे सेवेसीः-
पो बाळाजी जनार्दन साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा यांस बारशाचा अहेर व मुलास अलंकार व सनगें सांडणीस्वाराबराबर येणेंप्रमाणें खासगत आमचा.
सनगें. अलंकार मुलास दागिने.
७ अहेरास. २ मणगट्या पांच मण्यांच्या व
१ तिवट बागपुरी. मोत्यांच्या जोड १ यो दागिने यो
१ शेला बागपुरी. शहांत.
१ किनखाफ तांबडे. १२ मोत्यें.
२ जामेवारे बागपुरी. १० पांच ( दाहा ) मणी.
१ लुगडें पैठणी -----
१ खण पैठणी. २२
- १ पिंपळवन ये।। शहांत.
७ ९ हिरे.
२ मुलास सनगें बदली. १२ मोत्यें.
१ कुंची. ५ लोलकास.
१ पेहेरण. ७ सरास.
----- ------
२ १२
---- -----
९ २१
२ वाळे सोन्याचे पायांतील जोड
एक १ येणेंप्रमाणें दागिने.
------
५
यो सनगें नऊ व दागिने मुलांस पांच. पैकीं जवाहीर दागिने तीन व सोन्याचे दोन. येणेंप्रमाणें पाठविले आहेत. प्रविष्ट करून उत्तर पाठवावें. रा। छ. १ माहे जिलकाद. बहुत काय लिहिणें? लोभ असों दिजे. हे विनंती पो छ १२ माहे जिलकाद.