Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ३७१

श्री. १७१४ माघ शुद्ध १३


विनंती विज्ञापना ऐसिजे. नवाबांनी हिशबाचे प्रकर्णी मुनीरुलमुलूख बाहादूर व राजे चंदूलाल यांसीं पेशजीं बोलणें केलें होतें. त्याजवरून कारभारी व मुत्सद्दी यांणीं हिशेब तयार करून दाखविले. ते प्रत्ययास न येतां उत्तरें होत गेलीं. यास्तव राजाजीनीं आपले खाविंदाचे मर्जीचा खुलासा माहालांतून व शिकंदरयारजंग व शिकंदरकुलीखां याजकडून घेऊन कृपा संपादावी, याजकरितां कांही ऐवज नजर प्रमाणें कबूल केला होता. त्या ऐवजाची तर्तूद होऊन प्रविष्ट जाला नाहीं. यास्तव नबाबाकडील बोलणार निरंतर उभयतां कारभारी यांजकडे येऊन बोलणें करीत होतें. परंतु जाबसाल उगवण्यांत आला नाहीं. जाणोन छ ४ रोज गुरुवारी प्रथम प्रहर रात्र गुदरल्यावर, नवाबांनीं चोपदारासमागमें मुलूखमनसूफ व राजाजी यांजकडे ऐवज प्रकर्णी निरोप निकडीचा सांगून पाठविला. त्याजवरून राजे चंदुलाल आपले जागां बहुत विचारांत राहून, मीरआजमदअल्लीखां यांस बोलाऊं पाठविलें. मशारनिले, आलियानंतर दरबारास जाब सांगून, आपण व राजे गोविंदबक्ष व खानमजकूर यांची बोलणीं खिलवतींत अडीच प्रहर रात्रपर्यंत जाहालीं. छ ५ रोज शुक्रवारीं राजाजी दरबारास मुनीरुलमुलूखबहादुर यांचे जाण्यापूर्वी भोजनाचा गुंता उरकून, प्रथम प्रहराचे अमलांत मुत्सद्यांसहित खिलवतीचे दिवाणखान्यांत जाऊन बैसले. उपरांतिक दोन घटिकांचे अवकाशानें मुलूखमवसूफ येऊन पोंचले. उभयतां कारभारी दरबारास आल्याचें वर्तमान समजल्यानंतर, नवाब नवेदमहालांत बरामद जाहले. तेथें शामतजंग व हाफजयारजंग व शिकंदरकुलीखां व आसदयारजंग व अकबरयारजंग व मयाराम व मिर्धेताहरअल्लीखां यांस बोलाऊन घेतलें. त्यांचा सलाम मजुरा जाहाल्यावर किताबा पाहात बैसले. मीरदेतोहरअल्ली समागमें शुका लेहून कारभारी यांजकडे पाठविला. तो उभयतांनी पाहून, त्याचें प्रत्योत्तर लेहून दिल्हें. दोन प्रहर दोन घटकापर्यंत तीन वेळां नवाबाकडून शुके मिध्यें व आसीकबराबर आले ते पाहून त्या......तर, राजे चंदुलाल यांणीं पाठविली. मर्जीप्रमाणें जाबसाल उगऊन आले नाहींत. याजमुळें दरबारास जाब न सांगतां निद्रा केली, कारभारी खिलवतीचे दिवाणखान्यांत बसून राहिले. तीन प्रहरांनंतर जागृत होऊन कारभारी याजकडे निरोप व शुक मिर्धेताहरअल्ली असीकसमागमें पाठवीत गेले. त्याचीं उत्तरें व हिशेबाच्या फर्दा वरचेवर खाविंदांचे आज्ञेअन्वयें तयार करून राजे चंदूलाल पाठवीत होते. एक प्रहर दोन घटका रात्रपर्यंत बैठक होऊन परस्परें शुके येत गेले. नवाबाचे मनोदयारूप अमलांत न आलें, रात्र फार जाहली यास्तव दरबारास जाब बोलून जनान्याचा बंदोबस्त जाहला. कारभारी व मुत्सद्दी आपलाले मकानास गेले. राजाजी हवेलीस येऊन पोंचतांच, मीरअजमदअल्लीखां इंग्रेजांचे कोटीस जाऊन, त्यासीं बोलणें करून आले होते. त्यांजला बोलाऊन घेऊन गोविंदबक्षसहित त्रिवर्गाची खिलबत अडीच प्रहर रात्र पावेतों जाहली. उपरांतीक खानमवसुफास निरोप देऊन, उभयतां बंधूनीं भोजन करून, निद्रा केली. छ ६ राज मंदवारीं प्रथम प्रहरांत कारभारी व मुत्सद्दी यांनीं नित्यनेम उरकून दरबारास जाऊन, दिवाणखान्यांत बैसले. नवाब नवेद माहालांत जनान्याचे बंदोबस्तानें किताब पाहत होते. छ मजकुरीं कारभारी यांजकडे निरोप कांहींएक सांगून पाठविला नाहीं. अडीच प्रहराचे सुमारास दरबारास जाब बोलून निद्रा केली. मंडळी आपाआपले मकानास गेली. अमजदअल्लीखा प्रातःकाळीं रसल साहेब यांजकडे जाऊन त्यासीं राजे-मनसुफांचे सांगितल्याप्रमाणें बोलणें करून मशारनिलेनीं नानकराम याचे बागांत येण्याचा निश्चय ठराऊन आले. याची इतल्ला राजे-मोइनास केली. त्याजवरून बागांतील हवेलींत फर्शाची तयारी करवून, तीन प्रहरी उभयतां बंधू व अमजद-अल्लीखां पालखीचे स्वार होऊन गेले. नंतर एक घटकेचे आवकाशानें सावितजंग-बाहदूर व छोटे रसलसाहेब व कनिष्ट बंधू ऐसे त्रिवर्ग घोड्याचे स्वारीनें हवा खावयाचे निमित्यें निघून नानकराम याचे बागांत येऊन पोंहचले. चंदूलाल व गोविंदबक्ष उभयतां बागांतील दरवाजियाबाहेर येऊन घेऊन गेले. प्रथम बागाची सहल व मकानाची हौजकारंजी इत्यादिक तयारी पाहून, क्षेम कुशलतेची भाषणें जाहलीं. तदुत्तर, खिलवतीचे पकांनीं उभयतां राजाची व इंग्रज व खानमजकूर ऐसे बसून, दोन घटिका रात्रपर्यंत बोलणें जालें. त्या बैठकींत राजे मवसुफांनीं आपले खाविंदाचे मर्जीचा व दिवाणाचे वर्तणुकीचा वगैरे मजकूर तपशिलें समजाऊन बहुतच उदाशीची बोलणीं केलीं त्याजवरून मेस्तर रसल साहेब यांणी उभयतां बंधूंची खातरजमा फारच करून, अखेरीस वचनप्रमाण जाहलें, उपरांतिक राजेमोईन आपले जागां संतोष होऊन, ज्याफतीबद्दल फर्दू लिहून दिल्हा. आतर पानदान, फुलांचे हार व तरमेवा व खुष्कमेव्याचे खोन व आंब्याच्या डोल्या दिल्या. त्या घेऊन, इंग्रज बहादुर स्वार होऊन, कोठीचे मकानास गेले, तदुत्तर, चंदूलाल व गोविंदबक्ष यांणीं संध्या करून च्यार घटिका रात्रीं मकानास जाले. सारांश, नवाबाचें बोलणें कीं, हिशेबीं बाकी पस्तीस लक्ष आहे. ती व शेरणीबाबद रकम मीरमरहूम गेल्यापासून आजपर्यंत सरकार दाखल करावी. त्यास, येविसीं राजाजीचें बोलणें कीं तालुकियांत आमदानी कमी, याजमुळें शेरणीचा ऐवज वसुलांत आला नाहीं. माहालीं बाक्या येणें आहेत. तो रुपया निकड करून घेतला असतां, तालुकियाची लावणी न होतां उज्याड होतात. श्रीमंत महाराज यांचे सरकारांतुन कौल मनस्वी देऊन रयतीस तगाई देतात, यांजकरितां तमाम तालुकियांतील असाम्या उठोन श्रीमंतांच्या राज्यांत गेल्या आहेत व जातात. यास्तव ऐवज उगवून येत नाहीं म्हणोन. त्यास हें बोलणें नबाबाचे ध्यानास न येतां ऐवज मागण्याची निकड असे. आंख क्रोडीवरता आहे. व ज्याफतीबद्दल फर्द रसलसाहेब यांस दहा हजार रुपयांचा लेहून दिल्हा. ऐसें ऐकतों म्हणोन राजश्री त्र्यंबकपंत निसबत रायराया व अंबादासपंत यांणीं समजाविले व आणखी एक दोन जागां मातबर ग्रहस्थांचे मुखें बोलण्यात आलें. त्याजवरून शेवेसी विनंती लिहिली आहे. याउपरी जाबसाल निश्चयांत येऊन पक्केपणीं समजेल त्याची विनंती लिहीन. सेवेसी श्रुत व्हावें. रा। छ ११ माहे जमादिखर. लोभ असावा. हे विज्ञप्ति.