Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३६४
श्री १७१३ श्रावण वद्य ८
श्रीमंत महाराज राजश्री नाना साहेब स्वामीचे शेवेसीं:-
आज्ञाधारक शामराव बल्लाळ कृतानेक सा। नमस्कार विज्ञापना ता। छ२१ जिल्हेज सोमवार दोन प्रहर दिवस महाराजाचे कृपावलोकनेंकरून मुकाम वरुड नजीक वाफगांव मंडळीसहवर्तमान येथास्थित असे. विशेष. दत्तु खिजमतगार याणें मल्हारजीस तयार करून रातोरात काढून न्यावें हा विचार पका जाला. ही बातमी रा। भगवंतराव बल्लाळ दिवाण मा।निल याणें जलदी करून सिबंदीचे लोक ममतेचे दत्तूकडे पाठवून, दत्तूस हस्तगत केलें. हा मजकूर मल्हारजीस कळतांच त्यांणी दत्तूची कुमक केली. ह्मणोन सिध्याहातीं मल्हारजीसही धक्के मारून वाड्यांत अटकाऊन भोंवताली चवकी बसविली. खूनकरी दत्तु व खासा मल्हारजी कैद केला आहे. त्यास महाराजांनीं, मतकर होळकरांचा मामा वाकडू पा। सेवसी आलाच आहे, त्याची खातर रक्षावी, हा प्रसंग उपयोगींची आहे. तीर्थस्वरूप राजश्री नारायणराव व सखारामपंत यांजकडे रातोरात दत्तुखिजमतगारास कैद केल्याचें वर्तमान लिहिलें आहे. त्याणीं श्रुत केले असेल. पक्की बातमी भगवंतराव यांजकडे सूत्र आहे, तिकडून आली. महाराजांचे पायांचे प्रतापें जें होणें तें होत आहे. उत्तराची आज्ञा व्हावी. बहुत काय लिहिणें ? कृपा करावी. हे विनंति.