[२२३] ।। श्री ।। २८ जुलै १७६०.
पु॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः
विनंति उपरि. सुज्यातदौले व नजीबखान यांजकडील म॥र विस्तारें लिहिला व दिल्लींत फौज त्यांची हजारपर्यंत३०० आहे, अधिक नाहीं, येविशीं आह्मांस आज्ञा करावी ह्मणोन लिहिले तें कळलें. ऐशियास, दिल्लीस उभयतां सरदार व राजश्री बळवंतराव गणपत हुजरातची फौजसुद्धां रवाना केले. त्यांणीं दिल्लीस जाऊन, हल्ला करून शहर घेतलें. त्याच लगटासरसे किल्यांतहि लोक शेंपन्नास जाऊन पोहोचले. परंतु लोक किल्यांत जाऊन लुटीस गुंतले. त्यामुळे फिरोन किल्लेकारांनी सावध होऊन बाहेर काढिले. प्रस्तुत यांणीं तमाम शहरचा बंदोबस्त केला. किल्यास मोर्चे लाविले आहेत. लौकरीच फत्ते होईल. आह्मीहि दरकुच जात असो. एकादो दिवशी खासा स्वारी जाऊन पोहोचेल. तुह्मांस कळावें ह्मणोन लिहिले असे. र॥ छ १४ जिल्हेज. हे विनंति.