[२१८]                                       ।। श्री ।।            २२ जुलै १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यरानश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यासिः

पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. पत्रें पाठविलीं तीं पावलीं. सुज्यातदौले याजकडील व अबदालीकडील व रोहिले यांचें वर्तमान विस्तारें लिहिलें तें सर्व कळलें. ऐशियास, ये विषयींचा प्रकार अलाहिदा पुरवणी पत्रीं लिहिला आहे त्यावरून कळेल. वरचेवर तिकडील बारीकमोठें वर्तमान लिहीत जाणें. रवाना छ ९ जिल्हेज. हे विनंति.