[२१७ ऊ]                                    ।। श्री ।।            

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसि:

पो॥ महीपतराव२९९ आवजी कृतानेक सा॥ दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. आपलें पत्र आलें तें पावोन संतोष जाहला. लिहिला अर्थ सविस्तर कळों आला. ऐसेंच सदैव पत्र पाठीत जावे. श्रीमंताच्या पत्रांचीं उत्तरें पाठविलीं आहेत त्यावरून सर्व कळों येईल. श्रीमंतीं लिहिलेप्रें॥ तरतूद करावी. बहुत काय लिहिणें. हे विनंति.