[१९०] ।। श्री ।। २३ मे १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः-
पो। सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करणें. विशेष. राजश्री शामजी रंगनाथ यांस सुजाउद्दवले यांजकडे र॥ केलें आहे. तरी हे तेथपर्यंत सुरक्षित पोहोंचत तें करणें. पेशजीं तुह्मांस बुंधेले सरंजामसुद्धां सत्वर येऊन सामील व्हावे, दारुगोळ्याचा सरंजाम करून पाठवावा व ऐवजाची तरतूद करून पाठवून द्यावा, याविशीं लिहिलें होतें. त्याप्रमाणें तर्तूद करून सत्वर दारूगोळा व ऐवज सत्वर येई तें करणें, व बुंधेलेहि जमावसुद्धां जलद येऊन पावत तें करणें र॥ छ ७ सवाल. + बहुत काय लिहिणे हे विनंति.