[१८९] ।। श्री ।। २१ मे १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री बाळाजी गोविंद स्वामी गोसावी यासि:
पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणें. विशेष. राजश्री शामजी रंगनाथ यांस सुजातदौला याजकडे वकीलीस पाठविले आहेत. त्याजबरोबर निसबत नारायणराव बापूजी याजकडील स्वार दिल्हे आहेत. त्यांस रोजमरा आठवडा रुपये.
| २५ | स्वरुपजी मूळे स्वार | १० |
| ४७ | कानोजी हरपले | १९ |
| १२ | लक्ष्मण बाबाजी | ०५ |
| ८५ | ३४ |
एकूण ३४ चौतीस स्वारांस रोजमरा आठवडा रुपये पंच्याशी याप्रमाणें, महिन्याचे आठवडे चार, जोपर्यंत मशारनिल्हे कामकाजास तेथें राहतील तोंपर्यंत सदरहूप्रमाणें रोजमरा प्रांत बुंदेलखंड वगैरे महाल येथील ऐवजी देत जाणें + जाणीजे. छ ५ सवाल सु। सितैन मय्या व अलफ. बहुत काय लिहिणे. हे विनंति.