[१८५] ।। श्री ।। १४ मे १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजेश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः-
पोष्य सदाशीव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशळ जाणोन स्वकीय कुशळ लिहीत जाणें. विशेष. चितपावन क-हाडे यांचा कजिया२७३ श्रींत२७४ लागला आहे. आतां फारच वाढला असे. त्यास, परस्परें कजिये वाढून एक प्रकार दिसावें हें नसावें त्यास, जिकडून वाढला असेल तिकडून निराकरण करावें. यास्तव लिहिलें असे. त्यास, इतकें वाढावयाचें कारण काय? आतां तट कोणे गोष्टीचा पडला आहे तो लिहिणें. येथूनहि लिहावयाचें असेल तें लिहून पाठवूं. तुह्मीं क-हाडियांस लिहून कजिया न वाढून नीट होईल तें करणें. + वर्तमान कळलियावर दुतर्का लेहून मोडून टाकावे. लागेल तर लेहून पाठवणें व तुह्मींहि हाच यत्न करणें कीं कलह न वाढे. र॥ छ २७ रमजान. बहुत काय लिहिणे. हे विनंति.
पे।। छ १२ सवाल.