[१८१]                                        ।। श्री ।।              त॥ ६ मे १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्य राजश्री बाळाजी गोविंद व गंगाधर गोविंदस्वामी गोसावी यांस:

पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणें. विशेष. राजश्री *पाराशर दादाजी यांच्या फौजेने सीकस्त खादली, लुटली, नागवली, सिलेदार उठउठोन जातात, ह्मणोन राजश्री रखमाजी दादाजी यांणीं विनंति केली. त्याजवरून हें पत्र तुह्मांस सादर केलें असे. तरी मशारनिल्हेस हुजूर पाठवून देणें. आणिजे. छ २० माहे रमजान, सु॥ इहिदेसितैन मय्या२७१ व अल्लफ. बहुत काय लिहिणें. हे विनंति.