[१७५] ।। श्री ।। २८ एप्रिल १७६०.
राजश्रि नाळाजी गोविंद गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्नेहांकित मल्हारजी होळकर दंडवत. विनंति उपरि तुह्मीं राजश्री मकाजी मिते व गंगाधर विश्वनाथ याजबराबर तोफा सुमारें ५ पांच व बैल सर ५९० पांचशे नव्वद पाठविले ते सरकारांत पावले असत. सु॥ इहिदे सितेन, मय्या२६५ व अल्लफ. रवाना छ ११ रमजान. बहुत काय लिहिणें. हे विनंति.