[१७२]                                        ।। श्री ।।                ११ एप्रिल १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः -

पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. माघ वद्य पंचमीचें तुह्मीं पत्र पाठाविलें तें चैत्र वद्य दशमीस दोन महिने पांच रोजांनीं प्रविष्ट जालें. लिहिलें वर्तमान साद्यंत अवगत जालें. याउपरिहि तिकडील वर्तमान सविस्तर वरचेवरी लिहीत जाणें. चिरंजीव राजश्री भाऊ व राव तिकडे गेले. त्यांजकडे तुह्मीं येऊन सर्व निवेदन करणें. इकडेहि वर्तमान लिहीत जाणें. जाणिजे. छ २४ साबान, सु॥ सीतैन मय्या व अल्लफ.

पे॥ आषाढ वद्य ४.