[१७०] ।। श्री ।। २९ मार्च १७६०.
अखंडित लक्ष्मी अलंकृत जनार्दन आपाजी गोसावी यासिः-
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार सु॥ इहिदेसीतैनमयावअल्लफ२५८पै॥ मिती वैशाख शु।। ४ तुमचें हुजूर प्रयोजन आहे. तरी पत्रदर्शनीं हुजूर येणे. हिशेबकितेबाचा गुंता आहे ऐसा पर्याय लावून राहाल तर गोष्ट कार्याची नाहीं. हिशेबकितेब तुम्हीं तयार केले असिले, जलद येत आसिले, तर बरोबर घेऊन येणे. विलंब आसिला तर तुह्मींच येणें. जाणिजे. छ ११ साबान. आज्ञाप्रमाण.