[१६२] ।। श्री ।। ४ फेब्रुआरी १७६०.
राजश्रियाविराजतराजमान्यराजश्री जनार्दनपंत स्वामीचे सेवेसीः-
पोष्य गोविंद बल्लाळ सा।। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता॥ फाल्गुन वद्य ३ मुक्काम नजीक संबलगड जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. आह्मी कबिले बुनगे पावावयास आलों. तें संबलगडाजवळच चमेल उतरून पाविलें. कालीं फाल्गुन वद्य२३५ ३ रविवारीं मध्यरात्रीं राजश्री दत्ताजी शिंदे यांस पुत्र जाहला. उत्साहाकरितां आज मुक्काम केला. उदयिक पंचमीस कूच करून दरमजलींनीं येतों. वरकड भेटीनंतर सविस्तर बोलोन फार श्रम जाहले. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति.
पे॥ फाल्गुन वद्य १२.