[ १३१ ]                                 ।। श्री ।।      १५ जुलै १७५९.

राजश्री गोविंदपंत गोसावी यांसः - 

सकलगुणांलकरणअखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्ने।। समशेरबहादर सलाम. विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत असिले पाहिजे. विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावोन वर्तमान सविस्तर कळलें. र॥ नारो रघुनाथ याजब॥ हुंड्या पा॥ रुपये १५६००० येकलक्षछपन्नहजाराच्या पावत्या व राजे हिंदुपत यांजकडून टिक्याच्या कराराची याद पाठविली ती पावली. कळलें पाहिजे. र॥ छ १९ माहे जिल्काद. बहुत काय लिहिणें. लोभ कीजे हे विनंति.
पे॥ भा॥ वद्य ७ संवत् १८१५.