[ १२४ ] ।। श्री ।। १ मे १७५८.
राजश्री१७८ कमावीसदार, वर्तमान व भावी, परगणे फफुंद, प्रांत अंतरवेद, गोसावी यांसः –
सेहांकित रघुनाथ बाजीराव नमस्कार व आशीर्वाद. सु।। समान खमसेन मय्या व अल्लफ. बिबी रहिमां वगैरे यांणीं हुजूर कसबे लाहोरचे मुकामीं येऊन अर्ज केला कीं नवाब मनसूरअल्ली व वजीर यांणी परगणें मजकूरचे सायेरपैकीं रोज सहा आणे करून दिल्हे होते. त्याप्रमाणें चालिले. सरकारचा अंमल जाहालियापासून चालत नाहीं. तरी सुदामंतप्रमाणें करार करून द्यावें ह्मणोन. त्याजवरून हे सनद सादर केली असे. तरी मनसूरअल्लीखान वजीर यांणीं दिल्ह्याप्रमाणें परगणें मजकूरचे सायेरपैकीं दररोज रुपये .l= सहा आणे करार असेत; तरी सुदामंत चालत आल्याचा भोगवटा मनास आणून मोगलाई अमलांत चालत आलें असेल त्याप्रमाणें चालवणें. चालत असेल तें बंद न करणें. चालत नसेल तें न चालवणें. दरसाल ताजे सनदेचा उजूर न करणे. या पत्राची नकल घेऊन हे सनद भोगवटियास परतोन देणें. जाणिजे. छ २२ साबान आज्ञा प्रमाण.