[ ११२ ] ।। श्री ।। ६ आक्टोबर १७५७.
पे॥ छ २१ मोहरम गुरुवार सूर्योदय.
भगवंतराव यादव.
फतहुदीखान याचे जबानीं हिंदोस्तानचे वर्तमान ऐकिलें कीं वजीर व श्रीमंत दादासाहेब व आणखी सरदार फौजेचे एकत्र होऊन पठाणास जेर केलें. पठाण दबला. शेवटीं सलूख पठाणानें करून गेला. वजीर व दादासाहेब एकत्र होऊन पुढें लाहोराकडे चाल केली. आतां याजपुढें कोण्ही धीर धरीत नाहीं. कळावें. हे विज्ञापना.