Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठी धातुकोश
चाटळ [ चट् १ परिकल्कने + टल् १ वैल्कव्ये ] चहाटळपणा करणें, दुष्टपणाने वागविणें, निर्भर्त्सना करणें.
चाड १ [ चतिः ( चत् १ याचने ] चाड. उ०-याला संसाराची चाड असेल म्ह० विवंचना असेल.
-२ [ चदिः ( चद् १ याचने ) ] चाड.
चात [ चृत् ६ to bind ( whitney ) ( बांधणें }] उ०—वातीवर कापूस चातणें.
चाप १ [ चंप् १० गतौ ] चांपणें. उ०—त्यानें शंभर कोस जमीन चापली. ( चांप २ पहा )
-२ [ चप् १ सांत्वने] दटावणें.
-३ [ चप् १ सांत्वने ] उ०-मुलांना चापा; चापून सांगणें.
-४ [ जापयति ( जि णिच् ) जापयति = चापतो ]जिंकणे.
-५ [ जि (णिच् ) ( ज = च }] जापयति म्ह० जिंकवितो. चापती म्ह० जिंकवितो.
-६ [ जि । णिच् ] चापणें, जिंकणें.
-७ [ सम् + आ + पा १ पाने ] उ०-दूध, दारू चापणें.
-८ [ चप् १० परिकल्कने, ] चापून बांधणे.
-९ [ चि १० भाषार्थः ] खरड काढणें, निर्भर्त्सणें.
चांप १ [ सम् + आ + पा १ पाने ] ( चाप ७ पहा )
-२ [ चंप् १० गतौ ] चांफणे. उ०-त्यानें सोळा कोस जमीन चांपली म्ह० तो सोळा कोस गेला. इतर रूप-चांफ, चाप १.
-३ [ चप् १ सांत्वने ] चापणें, दटावणे.
-४ [ जंभ् १ चर्वणे ] चांवणें, ( चांव पहा )
चाप कर [ चम् १ सांत्वने ] चाप! हा उद्गारशब्द मराठींत आहे.
चापच १ [ सम् + पृच् ७ सम्पर्के ]
-२ [ स्पर्श १० आदाने-चस्पर्श ] चाचपणे. ( चापस ७ पहा )
चापट १ [ चपट ( ना. ) ( पंजा )] पंजानें मारणें.
-२ [ चप् १० परिकल्कने-कुटणें ] पंजाने मारणें. ( चांपट पहा )
चांपट [ चप् १० परिकल्कने-कुटणें-चपट ( बोटें पसरलेला हात ) } चापटणें, बारीक करणें. इतर रूप-चापट २.
चापड १ [ स्पृश् ६ संस्पर्शने ] फासणे.
-२ [ स्पर्ष् १ आदींभावे ]