Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
संस्कृत भाषेचा उलगडा
१२१)अ+स्+न्+उ=अस्नु
१२२) इ+स्+न्+उ=इष्णु
१२३) न्+अ=न
१२४) न्+आ=ना
१२५) ना+ना=नाना
१२६) न्+उ=नु
१२७) उ+उ=ऊ
१२८) उ+त=उत
१२९) न+इत=नेत
१३०) न+नु=ननु
१३१) उ +आ=वा
१३२) म्+आ=मा
१३३) च्+अ=च
१३४) च+इत्=चेत्
१३५) अ+अव्+इस्=आविस्
१३६) प्र+अत्+उस्=प्रादुस्
१३७) च्+इत्=चित्
१३८) कु+इत्=कुवित्
१३९) कु+अ= क्व
१४०) क+ऋ+हि=कर्हि
संस्कृत भाषेचा उलगडा
१०१) उ+अ+ऋ+ई = वरी
१०२) उ+अन्+अ=वम
१०३) उ+अन्+इ=वनि
१०४) उ+अन्+उ=वनु
१०५) उ+अ+ऋ+अ=वर, वल
१०६) उ+अस्=वस्
१०७) उ+अ+त्=वत्
१०८) उ+अ+स्=वस्
१०९) उ+अ+अन्+स=वान्स्
११०) उ+इ= वि
१११) उ+इत् =वित्
११२) इ+स्+अ=इष
११३) उ+स्+अ = उष
११४)ऊ+स्+अ=ऊष
११५) स्+अन्+इ=सनि
११६) स्+अ+ऋ+अ=सर
११७) स्+अस्=सस्
११८) स्+न्+अ = स्न
११९) उ+स्+अस=उषस्
१२०) स्+न्+उ=स्नु
संस्कृत भाषेचा उलगडा
८१) न्+इ=नि
८२) न्+उ=नु
८३) म्+अ=म
८४) म्+अन्=मन्
८५) इम्+अन्=इमन्
८६)ईम्+अन्= ईमन्
८७)म्+अ+अन=मान
८८) अम्+आन=अमान
८९) म्+इ=मि
९०) म्+ई=मी
९१) म्+इन्=मिन्
९२) इ+अ=य
९३) इ+उ=यु
९४) ऋ+अ=र,ल
अ+र=अर
इ+र=इर;ई+र=ईर;उ+र=उर
९५) ऋ+ई=रि, लि
९६) ऋ+ई=री
९७) ऋ+उ=रु,लु
९८) ए+रु=एरु;अ+रु=अरु;
आ+रु=आरु
९९) उ+अ=व
१००) उ+अन्=वन्
संस्कृत भाषेचा उलगडा
६१) इस+थ=इष्ठ
६२) उ=उ
६३) उ+क=उक
६४) उ+स्=उस्
६५) उ+उ=ऊ
६६) ऊ+क=ऊक
६७) त्+अ=त
६८) त+स्=तस्
६९) त्+इ=ति
७०) त्+उ=तु
७१) त्+न्+अ=त्न
७२) त्+न्+उ= त्नु
७३) त्+ऋ+अ=त्र
७४)त्+ऋ+इ =त्रि
७५) त्+ऋ+उ=त्रु
७६) त्+त्व+अ=थ
७७) त्+त्व+इ=थि
७८) त्+त्व्+उ=थु
७९) न्+अ=न
८०) न्+अस्=नस्
संस्कृत भाषेचा उलगडा
३६) क्+अम्=कम्
३७) इ+इ=ई
३८) स्+म्+अ=स्म
३९) स्+इ+इ+म्= सीम्
४०) त+अत्=तात्
४१) य+अत्=यात्
४२) अ+अत्=आत्
४३) अम+अत्=अमात्
४४) अ+क=अक
४५) अ+त=अत
४६) अ+न्+अ=अन
४७) अ+न्+आ =अना
४८) अ+न्+इ=अनि
४९) अ+न्+इ+इ=अनी
५०) ऋ=ऋ
५१) त्+ऋ=तृ
५२) अस्+इ=असि
५३) अ+अ=आ
५४) आ+क्+उ=आकु
५५) अ+अन=आन
५६) इ+न्=इन्
५७) इ+स्=इस्
५८) ई+क=ईक
५९) ई+य+अन्+स्=ईयान्स्
६०) ई+य्+अस्=ईयस्
संस्कृत भाषेचा उलगडा
११) त्+य+अ= त्य
१२) स्+य्+अ=स्य
१३) इ+म्=इम्
१४) इ+म्+अ=इम्
१५) अ+य् = अय्
१६) द्+य् = इय
१७) अद्+अ=अद
१८)अम्+अ=अम
१९)अन्+ अ =अन्
२०) अस्+ अ =अस
२१) अम् + उ =अमु
२२) अन्+य्+अ=अन्य
२३) त्+उ+अ= त्व
२४) अ+ उ+अ= अव
२५) स्+अम्+अ=सम
२६) स्+इम्+अ = सिम
२७) स्+उ+अ= स्व
२८) क्+अ=क
२९) क्+इम्=किम्
३०)क्+इ+इ+म्=कीम्
३१) क्+अत्=कत्
३२) क्+उ=कु
३३) क्+उ+इत्=कुविद् (कुद्त्)
३४) क्+अव=कव
३५)क्+इ=कि
संस्कृत भाषेचा उलगडा
६७ पृथक्करणार्थ नामांच्या आधी सर्वनामे घेण्याचे कारण असे आहे की क्रियाशब्द व सर्वनामशब्द हे प्राथमिक भाषेत प्रथम उदयास आले व नामशब्द क्रियाशब्दांच्या व सर्वनामशब्दांच्या मिश्रणापासून उत्पन्न झाले. असा प्रकार असल्यामुळे क्रियाशब्दांच्या वचनरूपांचे पृथक्करण केल्यानंतर सर्वनामांच्या वचनविचारांचा परामर्ष घेणे क्रमप्राप्त होते. अ, इ, उ, तू, स्, क्, य्, म्, न्, ह्म, हन्, अह्, तह्, त्व् ही प्राथमिक भाषेतील अत्यंत साधी सर्वनामे आहेत. यापैकी दोन, तीन किंवा चार सर्वनामांचा जोड होऊन खालील जोड सर्वनामे होतात.
१) अ+इ=ए
२) अ+त्= अत्
३) अ+म् =अम्
४)अ+न्=अन्
५) अ+स्= अस्
६) त्+अ=त
७) स्+अ=स
८) अ+इ+त्+अ=एत
९) अ+इ+स्+अ=एष
१०) अ+इ+न्+अ= एन
संस्कृत भाषेचा उलगडा
६६ क्रियाशब्दांना सर्वनामे जोडून जशी क्रियाशब्दाची वचने बनत, तशीच नामशब्दांना व सर्वनामशब्दांना सर्वनामे जोडून नामशब्दांची वचने बनत. देव शब्दापुढे स् हे सर्वनाम येऊन देवस् किंवा देवह् ऊर्फ देव: हे रूप होई व त्याचा अर्थ तो देव असा असे. देव शब्दापुढे अ व उ ही दोन सर्वनामे येऊन देव +अ+उ=देवा+उ=देवौ हे रूप बने. देव शब्दापुढे अ व अ ही सर्वनामे येऊन देव +अ+अ=देवा हें रूप बने. देवा म्हणजे हा व हा असे दोन देव आणि देवौ म्हणजे हा आणि तो असे दोन देव. देव शब्दापुढे अ, स्, व अस् ही तीन सर्वनामे येऊन देव+अ + स् +अस् = देवासस् हे रूप होते. देव +अ+स्+स्= देवास्= देवा: असे रूप होते. देव +अ+इ +इ किंवा देव +अ+अ + ई किंवा देव+इ+इ+इ= देवे असे रूप होते. देव +अन्=देवान् असे रूप होते. देवास: म्हणजे हा तो व तो असे तीन देव. देवा म्हणजे हा, तो व तो असे तीन देव. देवे म्हणजे हा, हा व हा असे तीन देव आणि देवान् म्हणजे अनेक, बहुत देव. हरि + स्= हरि: म्हणजे तो हरि. हरि + इ+इ = हरी म्हणजे हा व हा असे दोन हरि. हरि + अ + स् + हर्य: (उलगडून) हरय: म्हणजे हा, तो व तो असे तीन हरि. रमा + अ= रमा म्हणजे ती रमा. रमा + अ+इ =रमे म्हणजे ही व ही अशा दोन रमा. रमा + स्+ स्+ स् किंवा रमा + अ+ अ + स् = रमा: म्हणजे ती, ती, ती अथवा ही, ही व ती अशा तीन रमा. अभिजित् + त् किंवा स् = अभिजित्. अभिजित् + अ + उ = अभिजितौ. अभिजित् + अ + स् + स् = अभिजित:. नदी + इ = नदी म्हणजे ही नदी. नदी +अ+उ = नद्यौ म्हणजे ही व ती अश्या दोन नद्या. नदी+ स्+ स्+ स् = नदी: म्हणजे ती, तीं, ती अश्या तीन नद्या. नदी + अ+ स्+स् = नद्य: म्हणजे ही ती व ती अशा तीन नद्या. शा + स्= स: म्हणजे तो तो. त्+अ+उ = तौ म्हणजे हा व तो असे दोन ते. त्+अ+अ=ता म्हणजे हा व हा असे दोन ते. त्+अ+इ+इ किंवा त्+अ+इ+इ किंवा त् + अ + अ + इ = ते म्हणजे हा व हा व हा असे ती ते. अस (अ+स्+अ) + उ= असौ म्हणजे हा हा. अमु (अम्+उ) उ + उ = अमू म्हणजे हा व हा असे दोन हे. अम्+उ+उ= अमू म्हणजे हा व हा असे दोन हे. अम्+इ+इ+इ= अमी म्हणजे हा, हा व हा असे तीन हे. अय्+अम्+अयम् म्हणजे तो हा. इम+अ+उ = इमौ म्हणजे हा व तो असे दोघे हे. इम+ इ+इ+इ किंवा इम + अ+इ+इ = इमे म्हणजे हा व हा व हा असे तिघे हे. इय्+अम्= इयम् म्हणजे ही ही. इमा+अ+इ= इमे म्हणजे ही व ही अशा दोघी क्या. इमा+अ+स् = इमा: म्हणजे ही व ही व ती अश्या तिघी या. इयम् या रूपात इ हे सर्वनाम स्त्रीलिंगी योजिलेले प्रथम दिसते. तसे च, इमे, इमा:, या रूपात इम. हे आकारान्त सर्वनाम स्त्रीलिंगी योजिलेले प्रथम दिसते. इमा हे जोड सर्वनाम इम् व आ या दोन सर्वनामांचा जोड आहे. पैकी आ हे सर्वनाम स्त्रीलिंग योजिलेले आहे. आभि:, आसाम्, आसु या विभक्तिरूपात हे स्त्रीलिंगी आ रूप आलेले आहे. इ व आ ही दोन सर्वनामे स्त्रीलिंगी समजण्याचा हा प्रारंभ होय. सा + अ = सा म्हणजे ही ती. ता + अ + इ किंवा ता + इ + इ= ते म्हणजे ही व ही अशा दोघी त्या. ता + अ+ अ + स् = ता: म्हणजे ही व ही व ती अशा तिघी त्या. असा + उ = असौ म्हणजे ही ही. अमू + उ+ उ + स् = अमू: म्हणजे ही व ही व ती अशा तिघी या. अमतील दीर्घ ऊ स्त्रीलिंगी समजण्याचा हा प्रारंभ आहे. त् + अत् = तत् म्हणजे ते ते. त् + अ + इ = ते म्हणजे हे व हे अशी दोन ही त् + अ+ अन्+ इ= तानि म्हणजे हे, दुसरे व हे अशी तीन ही. त् + अ+अ+अ = ता म्हणजे हे व हे व हे अशी तीनही, नामशब्द व सर्वनामशब्द यांची वचनरूपे क्रियाशब्दांच्या वचनरूपांच्या धर्तीवर चालतात, हे वरील उदाहरणावरून स्पष्ट होत आहे. वरील उदाहरणात नामांचा व सर्वनामांचा केवळ उदाहरणाकरता म्हणून अत्यंत त्रोटक उल्लेख केला. परंतु नामे व सर्वनामे यांच्या वचनांचा विचार अत्यंत महत्वाचा असल्यामुळे तो येथे साद्यन्त देतो. प्रथम पृथकरणार्थ सर्वनामे घेतो. मधु ( प्र. ए.) मधुँ + इ+ इ = मधुनी मधुँ + उ + उ+इ = मथुनि. हरिँ + इ+ इ = हरिणी. हरिँ + इ+इ+इ = हरीणि मधुमत् + इ+इ = मधुमती. मधुमत् + न् + इ= मधुमन्ति.
संस्कृत भाषेचा उलगडा
६५ क्रियापदरूपांच्या वरील पृथक्करणावरून स्पष्ट होते की, उघड्या नागड्या क्रियाशब्दापुढे दर्शक सर्वनामे व पुरुषसर्वनामे योजून प्राथमिक ऋषिपूर्वज वाक्ये बोलत असत. क्रियेचा एक कर्ता दाखवावयाचा असल्यास एक मुख्य सर्वनाम व दोन, तीन, चार किंवा पाच कर्ते दाखवावयाचे असल्यास दोन, तीन, चार किंवा पाच सर्वनामे ते लोक क्रियाशब्दापुढे योजीत. कर्ता जवळचा प्रत्यक्ष खास स्वत: हजर आहे हे दर्शविण्याकरता कर्तृवाचक सर्वनामाला जवळ हा अर्थ दर्शविणारी सर्वनामे विशेषणे म्हणून मुख्य सर्वनामाला जोडीत. कालांतराने बहुत्ववाचक अन् व त्रित्ववाचक रिर, इर व र् ही सर्वनामे त्रिवचन व बहुवचन दर्शविण्याकरता क्रियाशब्दापुढे हे लोक लावू लागले. क्रियाशब्दापुढे उत्तमपुरुषी अ, ह्म, इ, उ, अस् किंवा अह्, हन्, स, स्म् ही सर्वनामे, मध्यमपुरुषी त्व, त्, स्, तह्, अत्, अम्, उ, अन् ही सर्वनामे व प्रथमपुरुषी अ, इ, उ, त्, अत्, अस्, उस्, अन्, अम् ही सर्वनामे येत. म्हणजे एकंदर स्म्, ह्म, अह्, त्व्, तह्, त्, स्, अ, इ, उ, अत्, अस्, उस्, अन्, (अ+न्) अम् (अ+म्), रिर्, इर्, र् इतकी सर्वनामे प्राथमिक आर्यपूर्वज क्रियाशब्दांच्यापुढे योजीत व प्राय: एक, दोन, तीन क्कचित् चार किंवा पाच कर्ते क्रियेचे आहेत हे दर्शवीत. तात्पर्य, क्रियाशब्दांना सर्वनामे जोडून वचने बनतात.
संस्कृत भाषेचा उलगडा
मध्यमपुरुषत्रिवचनाची रचना येणेप्रमाणे होते. पा+त्+त्व्+अ=पाथ+अ=पाथ; म्हणजे तो, तू व हा असे तिघे रक्षिता. भव्+अ+त्+त्व्+अ=भवथ; म्हणजे हा, तो तू व हा असे चौघे होता. कल्पय्+अ+त्+त्व्+अ+अ=कल्पयथा; म्हणजे हा, तो तू व हा असे तुम्ही पाच जण रक्षिता, भव् + अ + त् + त्व् + अन् + अ =भवथन; म्हणजे हा, तो तू, दुसरा आणि हा असे तुम्ही पाच जण रक्षिता. (अन् चा अर्थ बहुत असा धरिला तर) असे तुम्ही बहुत जण रक्षिता. अ+बिभृ+त्व्+अ+अ=अबिभृत, म्हणजे तू, हा आणि हा असे तुम्ही तिघे भरता. येथे शेवटल्या अचा पूर्वरूप संधी झाला आहे. अ+ बिभृ+त्व्+ अन्+अ=अ विभृतन; म्हणजे तू, दुसरे व हा असे तुम्ही बहुत जण भरता. अ+भव्+अ+त्व+अ=अभवत; म्हणजे हा तू व हा असे तुम्ही तिघे होते.
जग्म्+त्व्+अ+अ+= जग्म्+स्+अ+अ= जग्म् +ह्+अ+अ = जग्म्+अ+अ+अ=जग्म; म्हणजे तू, हा व हा असे तुम्ही तिघे जाता. येथे शेवटील दोन्ही अ चा पहिल्या अ शी पूर्वरूप संधी झाला आहे. ब्रू+त्+त्+ त्व्+ए = ब्रू + ध्व् + ए = ब्रूव्वे; म्हणजे तो, तो, तू, असे तुम्ही खास तिघे स्वत: बोलता. भव् + अ + त् + त् + ध्व् + ए = भव + व्व् + ए = भवध्वे; म्हणजे हा, तो, तो व तू असे तुम्ही चौघे स्वत: होता. अ + ब्रू + तू + त् + त्व + अम्=अब्रू + ध्व्+अम्=अब्रूध्वम्; म्हणजे तो, तो, तू व हा असे तुम्ही चौघे बोलता. अ+भव्+अ+त्+त्+व्+अम्=अभव+ ध्व्+अम्=अभवध्वम्; म्हणजे हा, तो, तो, तू व हा असे तुम्ही पाच जण स्वत: बोलता. ब्रू+त्+त्+त्व्+अम्=ब्रू + ध्व्+अम् =ब्रूध्वम्.भव्+त्+त्+त्व्+अम्=भवध्वम्.यज्+अ+त्+त्+त्व्+अ=यज+ध्व+अ =यजध्व; म्हणजे हा, तो , तो व तू असे तुम्ही चौघे स्वत: यज्ञ करता अम् च्या स्थानीं अ सर्वनाम योजिलें आहे, इतकेच. दुसरे कोणतेही दर्शक सर्वनाम योजिले असते तरी आश्चर्य मानावयास न लगे.वारय्+अ+त्+त्+त्व्+अ+अत्=वारय+ध्व्+आत्= वारयध्वात्; म्हणजे हा, तो, तो, तू व हा असे तुम्ही पाच जण स्वत: वारता. येथे अम् किंवा अ हे सर्वनाम न योजिता शेवटी अत् सर्वनाम योजिले आहे. कल्पय् +अ+त्व्+अ+अ= कल्पय+ता = कल्पयत; म्हणजे हा, तू व हा असे तुम्ही खास तिघे कल्पिता. कल्पयत या रूपात अंत्य अ चा पूर्वरूप संधी केला आहे व कल्पयता या रूपात परिपाठांतला आ संधी केला आहे.