Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु॥ इहिदे शितैन मया व अलफ, सन ११७० फसली,
अवलसाल छ १९ सवाल, ४ मे १७६०,
ज्येष्ठ वद्य ५ शके १६८२.
पर्जन्यकाळ शांत झाल्यावर सदाशिवराव यानीं दिल्लींत अलमगीर याचे जागीं शहाअलम याचा पुत्र अलीगोर ऊर्फ मीरजमाल तक्ताधिपति करून दुसरा शाहालम असें नांव ठेविलें व सुजायतदौला यास वजिरी दिली व नारो शंकर यास राजेबहादर असा किताब देऊन त्यास तेथें बंदोबस्तास ठेविलें. नंतर कुंजपुरा कोट आहे तो तोफा लावून पाडून तें स्थान घेतलें. इतक्यांत अबदाली यमुना उतरून अलीकडे अक्टोबर सन १७६० चे २५ तारखेस आला. नंतर दुसरे दिवशीं युध्द झालें. त्यांत मराठे मसलत करीत कीं, उद्यां एकदम मुसलमानांवर हल्ला करावा. होळकर याचें ह्मणणें असें न करितां धान्यादिकांचा तोटा करावा. त्याजवर इब्राहिम गार्दी याचें ह्मणणें तोफांचे हल्ले करावे असें पडलें. होळकर याचें ह्मणणें अमान्य केलें. इतक्या मसलतींत मराठ्यांचें लष्कर मागें हटत पानपतावर आलें. गारद्याचे मसलतीनें भाऊनीं आपलेसभोंवतीं खंदक ८ हात खोल व ३३ हात रुंद खणिला. इतके अवसरांत अबदाली जवळ येऊन उतरला. मुसलमानांचें सैन्य ४१८०० स्वार व पायदळ ३८,००० व तोफा ७७ होत्या. मराठ्यांकडे ५५,००० स्वार व १५,००० पायदळ व शिवाय पसाराबुणगे दोन लक्ष होते. याप्रमाणें लष्कर असतां गोविंदपंत बुंदेले यास शत्रूकडील धान्यादिकांचा नाश करण्यास पाठविलें. त्यास अबदालीचे सरदारांनीं डोकें कापून घेतलें. सन १७६० चे नवंबर तारीख २९ पासून आरंभ होऊन तारीख २३ दिसेंबरपर्यंत झालें. रुपयांच्या थैल्या दिल्लीहून कितीएक स्वार येत होते, ते रात्रीची वाट चुकून अबदालीचे लष्करांत जातांच त्यांस मारून तें द्रव्य घेतलें. तारीख २४ दिसेंबर रोजीं नजीबउद्दवला व बळवंतराव गणपत यांचें युध्द झालें. बळवंतराव मेहेंदळे गोळी लागून ठार झाले. बायको सती गेली, छ २८ रबिलाखर (७ डिसेंबर १७६०). नंतर कांहीं दिवस युध्द होत असतां भाऊसाहेब यांचे लष्करांत धान्याचा तोटा पडून पौष शुध्द ८ रोजीं सरकारकोठींतील धान्य सर्वांस वाटून दिलें. ते पोटभर जेवले. पोष शुध्द ८ रोजी पुढें तोफा व जबूरे व जेजाला व बाणदार व इब्राहिमखा पलटणीसुध्दां होते. त्यामागें दमाजी गायकवाड, त्यामागें वरकड सरदार व जनकोजी शिंदे यांचें लष्कर व उजवे बाजूस व डावीकडे इब्राहिमखान मदत सदाशिवरावभाऊ.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
केसररसकुसुमोदपूरितधारायंत्रोच्छलितकणजालाद्रीकृतनायिकांबरप्रकटित-
कोमलावयवोदितकामवीचिचयनिमग्ननायकै, र्मृगमदकर्पूरसौरभितपाटीरपटकसधूली-
खेलनपरै:-पंचमांचितपंचवदनविपंचीरचितसरिगमपदनिप्रकृतिप्रस्तारलब्धविकृतिमेल-
कललतादिरागानुबंधितसबंधबंधुरगीतानिषंगकोत्तुंगमृदंगोत्थितदृतप्लुतादिभेदघटितधिमि-
किटिकिटिकिटितात्थात्युत्कटत्रिवटतालोल्लसितवारांगनागानलोलै, र्विंविध-
विलासालसमुकुलितलोचनकमलै:, शृंगाररससंसेवनावशसरसरसालमंजुमंज-
रीरंजितकरपल्लवोल्लसितवसंत:। श्रीमद्विवाहारंभसंभ्रमसंभृतपंचम्यागमत् । अत: वसंत:
समागतवसंतेनसह कलहालापं करोति । यथा । दुर्मदे परविषयाभिलाषदोषभूषण-
दैवयोगान्मयि सकलविलासानां सर्वस्वं श्रीमत्परिणयनं प्राप्तम् । तत्र मोहकवंचकांडंबरेण-
भवत्प्रयोजनं किमिति कोलाहले कृते सति सात्वनं करोति । रे बंधुवर त्वं मम गुरुसमोसि,
त्यक्त्वा बंधुत्वमात्सर्यं श्रुत्वा मदीयाननयवचनम् । तत: प्रसृतकर: शिशिर: । रे वंचक
यत्कणीयं तत्कुरु । तत्र वसंतानुनयोक्ति: ।
शृंगारवैभवधुरंधरमारराज -
राज्यानुसाह्यकरसांद्रसुखो वसंत ॥
श्रीमद्विवाहबहलोत्सवकौतकस्य
भागं वरं शिशिरबंधुवरे ददाति ॥७॥
रे तोत यदि प्रबलापूर्वभाग अकृतलौकिकस्वभागं स्वगृहे गृहीत्वा प्रमुदित: सन् इति
शिष्टाचाराद् भ्रातृयुगुलं सुखं वसति स्म । तत: प्रविशति माघमास: ।
विचित्रधर्मानवलोक्य माघ:
स्वकीयपुण्यार्जितशुक्लपक्षम् ॥
नियम्य विद्वत्कुलपालकस्य
विवाहकीर्त्याभरणेक्षणेषु ॥८॥
तत: प्रविशति तिथि: ।
तिथिकुले कमलार्चनयागत:
किल महानवमीतिसमीरिता ॥
तदधिकत्वधिया धरणीधरोद्वहनमानवती भवति त्वियम् ॥९॥
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
श्रीमंतांनी पुष्कळ रीतीनें सांगितलें. तत्राप आपणच जाण्याचा आग्रह धरिला. सबब चिरंजीव विश्वासराव यांस त्यांजबरोबर घेण्याचा विचार ठरवून छ २५ रज्जब रोजीं (१४ मार्च १७६०) फाल्गुन वा १२ शुक्रवारीं सर्व तयारी करून चैत्र शु॥ १ चे (१८ मार्च १७६०) मुहूर्तानें पानपतचे स्वारीस चालते झाले. श्रीमंत पुण्यास परत आले. यासालीं दुस-या किरकोळ गोष्टी घडल्या त्या. छ ११ रमजान (२८ एप्रिल १७६०) मुलेरचा किल्ला घेतला. इंग्रजांशीं सलाबतजंग यानें तह करून मच्छली बंदर इंग्रजांस दिलें. छ ६ जिल्हेज (३१ जुलै १७५९) नाना पुरंदरे यांचे घरीं मु॥ शिक्का होता तो त्र्यंबकराव मामा पेठे सातार यांस पाठविलें, त्याचे हवालीं केला. नारायणराव व्यंकटेश कर्नाटकांत पाठविला. यास मुतालकी शिक्का दिला छ १२ रमजान (२९ एप्रिल १७६०) पुण्याचें गांवकुसूं चिरेबंदी करण्याचें काम जिवाजीपंत अण्णा खासगीवाले यांचोमार्फत चाललें होतें. सुरत अठ्ठावीस पैकी सात महाल दमाजीपासून घेतले. दोन घटका रात्रीस तारा पडून मोंठा आवाज नगा-यासारखा या साली एके दिवशीं झाला होता. भाऊसाहेब स्वारीस निघाले. त्याजबरोबर वीस हजार स्वार, पायदळ व गारदी इब्राहिमखान तोफखानासुध्दां, दहा हजार लोक, व याखेरीज पेशवे यांनीं आज्ञा केल्यावरून मल्हारराव होळकर, जनकोजी शिंदा व दमाजी गायकवाड, यशवंतराव पवार व अप्पाजीराव आठवले व अंताजी माणकेश्वर व गोविंदपंत बुंदेले वगैरे सरदार फौजेनिशी त्यास मिळाले, व याशिवाय रजपूत लोक आपापल्या टोळ्यांनिशी. सदाशिवराव याजबरोबरही बळवंतराव गणपत मेहेंदळे, व समशेर बहादर नारो शंकर व विठ्ठल शिवदेव विंचूरकर व त्र्यंबकराव सदाशिव पुरंदरे याशिवाय मराठे सरदार आले होते, व होळकर याचे स्नेहाकरितां सुरजमल जाटही तीस हजार फौजेसहित आला. या लष्करासहित येऊन प्रथम दिल्ली घेतली. पुढें जावें तों पर्जन्यकाळ आला, ह्मणून डेरे देऊन राहिले. भाऊसाहेब यांचें लष्कर दोन लक्ष, व दोन कोट रुपये जवळ होते, ते खर्चास पुरणार नाहींत, ह्मणून दिल्ली बादशहाचा दिवाणखाना सोन्यारूप्यानें मढविलेला होता, तो होळकर व जाट सुरजमल सांगत असतां, न ऐकून मोडून सतरा लक्ष रुपये उत्पन्न केले. तो अन्याय पाहून सुरजमल व रजपुतांचें लष्कर निघून माघारें गेलें. इतक्यांत अबदाली यानें गंगेचे कांठीं डेरे देऊन सुजायतदौला आपल्याकडे करून घेतला. या सालीं भाद्रपदमासीं मोठा पाऊस पडला. पक्षाचे दक्षिणेस ब्राह्मण पर्वतीस गेले होते. ओढ्यास पाणी येऊन दोन चारशें ब्राह्मण वाहून गेले. (१९ सप्टंबर १७६०).
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
हस्तनापुरास येऊन तेथून वैशाख शुध्द १० शके १६८१ रोजीं (२१ मे १७५९) दोन कोस मिरापुरावर मुक्काम केला. भाद्रपदपावेतों (सप्टंबर १७५९) गोळागोळी चालली. शिंद्याचे लष्करांत महागाई झाली. रसद येईना. भाद्रपदअखेरीस मोठी लढाई झाली. जनकोजी व दत्ताजीस जखमा लागल्या. जिवाजी हणमंतराव शिंदे पडले. नजीबखान याची फौज भागीरथीस पूल बांधिला होता त्यावरून पलीकडे गेली. पूल राखिला. नंतर कार्तिक शुध्द १ रोजीं (२१ आक्टोबर १७५९) शिंदे यांनीं गोविंदपंत बुंदेले व अंताजी माणकेशर याचे पुत्र तात्याजी, जिवाजी नाईक भोईटे व तुकोजी होळकर यांजबरोबर वीस हजार फौज देऊन जेता गुजर याचे विचारें हरिद्वाराजवळ भागीरथीपलीकडे गेले. असें नजीबखान यास कळतांच सुजायतदौला यास सांगून पाठविलें. तो पन्नास हजार फौजेनिशी आला. गोविंदपंत बुंदेले पळून गेले. हे मूळचे फितूरी होतेच. नंतर सुजायतदौला भागीरथीपलीकडे उतरला. इकडे अबदुलअल्ली खंदारबादशहा लाहोरास येऊन त्रिंबक बापूजीचा मोड केला. ते पळून दिल्लीस गेले. दिल्ली बादशहा यानें अबदालीस गाजुद्दीखान यास मारण्याचा संकेत ठरवून बोलाविलें. हीं संकेताची पत्रें गाजुद्दीन वजीर यास सांपडलीं. त्यावरून त्यानें एकदम बादशहा अलमशहाचा शिरच्छेद केला, आणि शिंदे यास लिहिलें. त्यावरून तेही कुंजपुरावर आले. मागाहून अबदाली आला. त्यास सुजायतदौला मिळाला. लढाई झाली. साबाजीचा पुत्र बयाजी शिंदा ठार पडला. मालोजी शिंदे पडले. जनकोजी शिंदे यास जबर जखम लागली. यशवंतराव जगदेव पडले. दत्ताजी गोळा लागून पडले. त्यांचा शिरच्छेद कुतुबशहानें केला. शिर नजीबखानाजवळ दिलें. त्यानें रुमालांत घालून अबदालीपाशीं नेलें. तें सुजायतदौला यानें दोन लाख रुपये देऊन मागून घेऊन दहन केलें. नंतर रूपराम कठारी जनकोजी घायाळ यास व भागीरथीबाई गरोदर होती तिजला व काशीबाई जनकोजीची स्त्री अशीं घेऊन पळाला, तों गिलचे पाठीस लागले. त्याजबरोबर गाजुद्दीन पळाला. एका दिवसांत ८० कोस कोटपुतळीस आले. मल्हारराव यास येणेंविषयीं पूर्वींच पत्र लिहिलें होतें. त्यांनीं जयनगरचा रोख सोडून शिंद्याकडे येत असतां त्यांची अशी दाणादाण होऊन कोटपुतळी येथें गांठी पडल्या. शिंद्यास डेरे, राहुट्या, पाल, पडदे वगैरे देऊन निघतात तों मागाहून लष्करचीं पळालेलीं माणसें फौज वगैरे मिळालीं. दोन फौजा एकत्र झाल्या. नंतर बायका देशी पाठवल्या. त्या दहावे दिवशीं चमेलीस आल्या. नंतर कुवरी नदीवर मुक्काम झाला. तेरावा पौष वा। १३ भागीरथीबाई प्रसूत झाली. पुत्र झाला. नंतर बाया उज्जनीस गेल्या. शिंदे होळकर यांचे पाठीस दुराणी लागले. नंतर पळत पळत ज्येष्ठमासपर्यंत (मे १७६०) जात असतां दुराणी कोळजळेश्वरास राहिला. यमुनेस पाणी आलें. शिंदे होळकर केरालीचे सुमारें चमेलीवर राहिले. दत्ताजी शिंदे वारल्याची खबर देशी आली. तेवेळेस भाऊसाहेब पड दुरानजीक मोंगलाईंतच तांदुळज्याची लढाई आटपल्यावर होते. तेव्हां या हिंदुस्थानचे स्वारीस दादासाहेब यांसच पाठविण्याचा श्रीमंतांचा विचार होता. परंतु त्यांनीं लाहोरच्या स्वारीस खजीना वगैरे कांहीं न आणितां उलटे कर्ज ८०००००० ऐंशी लाख करून आले होते. हें भाऊसाहेबांस बरें न वाटून मीच या स्वारींत जातों अशा आग्रहास पडले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
बासष्ट लक्षांची जहागीर देण्याची कबूल करून नबाब परत आपले जागीं गेले. श्रीमंत नानासाहेब व दादासाहेब परत पुण्यास आले. हिंदुस्थानाकडील वर्तमान:- जनकोजी शिंदे मारवाडाकडील बंदोबस्त करून रेवडीवर जाऊन पोहोंचले. तेथें दत्ताजीही जाऊन पोहोंचले. पुढें दिल्लीस जाऊन गाजुद्दीखान वजीर याचें व त्याचें बनेना. कारण यास नजीबखानाचा पक्ष धरण्याचा होता. पुढें कांहीं तोफा दिल्लीस होत्या, त्या गाजुद्दीन याजपाशीं मागितल्या असतां देईना. लढाई होऊं लागली. तत्रापि शिंदे यानीं बळेंच दोन तोफा घेऊन कुरुक्षेत्रास निघाले. तोफा फार जड, त्या मध्येच पडल्या. शतद्रूपर्यंत गेले. लाहोरचा सुभा अदीनाबेग त्याचा पुत्र भेटला. त्याचे विचारें साबाजी शिंदे व त्र्यंबक बापूजी यांस १५००० फौज देऊन लाहोर, मुलतान व काश्मीर व पंजाब अटकेपर्यंत मुलुखाचे जप्तीस पाठविलें, आणि आपण कुंजपुरानजीक येऊन मुक्काम केला. तेथें गोविंदपंत बुंदेले भेटले. त्यांजकडे पूर्वीं नजीबखान यानें संधान लाविलें होतें कीं, मल्हारबांनीं तुचे हातीं आह्मांस दिलें, तुह्मीं आह्मांस साह्य करावें असें बोलणें लाविलें होतें. त्याजवरून गोविंदपंत यांनीं दत्ताजीस सांगितलें जे, नजीबखान भेटतील, भागीरथीचे पुलाचा मनसुबा त्यांचे हातीं होऊन जाईल ह्मणून बोलला. ते शिंद्यांशीं बरें आहे असें बोलले. इतक्यांत नजीबखान पांच हजार फौजेनिशी येऊन भेटला. सर्व मंडळी व बाया वगैरे यांचे मनांत, हा अनायासें थोडे लोकांनिशी आला. याचें निर्मूलन करण्यास संधि बरी आहे, असें सर्वांनीं सांगितलें असतां दत्ताजींनीं न ऐकतां, भागीरथीस पूल बांधून द्यावा, पलीकडील जो मुलूख मिळेल त्यापैकीं दहावा हिस्सा तुह्मांस देऊं असा तह ठरविला. तो कपटी, त्यानें ही साजकरोटी ह्मणजे शफत शिंद्यांशीं केली. नंतर तो नजीबखान शुक्रताल येथें जाऊन सुजायतदौला यास सांगून पाठविलें कीं, दत्ताजी शिंदे तुह्मांवर येतात. तेव्हां त्यानें नजीबखान यास निरोप पाठविला कीं, मी तुमचा आहें, पन्नास हजार फौज तुह्मांस देतों व पैसाही लागेल तो देतों व तुचें साह्य करितों, गनीमास नदीपार होऊ देऊं नये. असें वचन ऐकतांच अबदालीकडे नजीबखान यानें संधान लाविलें, आणि शुक्रताल भागीरथी उत्तरवाहिनी येऊन पालखीच्या दांडीसारखी वळण पडून दक्षिणेकडे गेली आहे. जेथें शुकांनीं परिक्षिति राजास भागवत सांगितलें, ती जागा मोठी बिकट खळ्या भारी कांहीं ठिकाणीं वाट होती, तेथें तोफा व खंदक खणून फौज ठेवून असाध्य असें नजीबखान यानें केलें, आणि शिंदे यास निरोप पाठविला कीं, बरसात खलास झाल्याशिवाय पूल होत नाहीं, तुह्मीं येऊं नये, पुढें पाहूं, आह्मांस येण्यास होत नाहीं. तेव्हां दत्ताजीस त्याचें कपट उमजलें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु॥ शितैन मया व अलफ, सन ११६९ फसली,
अवलसाल छ ९ सवाल, ५ मे १७५९,
ज्येष्ठ शुध्द १० शके १६८१.
अहमदनगरचा किल्ला मोंगलाकडून कवीजंग किल्लेदार याजकडे होता. तो पुण्यानजीक, मजबूत, सरकारांत असावा अशी खटपट बहुत दिवस मनांत होती. परंतु हा किल्ला हातीं येणें महत्प्रयास. त्याकरितां कांहीतरी किल्लेदाराशीं राज्यकारण केल्याशिवाय किल्ला हस्तगत होणार नाहीं. हा विचार करून किल्लेदार यास किल्ला गोळी न वाजतां सरकारांत तुह्मी दिल्यास वंशपरंपरें पनस हजारांची जहागीर देऊं अशी कराराची यादी शपथ बेलभंडारा देऊन ठरविली. त्याजवरून कवीजंग यानीं किल्ला या सालीं सरकारांत दिला, व त्यास कराराप्रमाणें जहागीरही पेशवे यांनीं पन्नास हजारांची दिली. छ १८ रमजान रोजीं (१६ मे १७५९) पा लखमेश्वर प्रांत कर्नाटकपैकी शिरहट्टी किल्ला व त्याखालील मुलूख लखमगौडा देसाई याजकडे होता. तो सरकारांत घेऊन देसाई व त्याचे पदरचे कारकून यांस कांहीं जमीन गांवगन्नापैकीं व नक्त नेणूक दमगी वगैरे चार गांव असे दिले, (५ मे १७६०) सोमवारीं. जंजिरेकर हपशी यानें बिघाड करून कोंकणप्रांतीं स्वार पाठवून उपद्रव करूं लागला. सबब याजवर रामाजी महादेव व शंकराजी नारायण व माणकर यांस पाठवून पारपत्य करून त्याजकडून उंदेरी किल्ला छ १० जमादिलाखर रोजीं (२९ जानेवारी १७६०) सरकारांत आला. या कामीं आंग्रे यांनीं बहुत कुमक केली. मानाजी आंग्रे यांनी कुमक केली. सोमवारीं घेतला. छ ६ रबिलावल रोजीं (२८ आक्टोबर १७५९) भाऊसाहेब डे-यांत असतां मुजफरखान याचा जांवई यानें डे-यांत शिरून भाऊसाहेब यांजवर हत्यार चालविलें. इतक्यांत जवळ लोक होते त्यांनीं त्यास धरिलें. विशेष जखम लागलीं नाहीं. तो हें कृत्य करण्यास मुजफरखान यानें सांगितलें ह्मणून बोलला, व त्याप्रमाणें मुजफरखान यानें कबूल केलें. त्या दोघांचा शिरच्छेद तेच वेळेस केला व रामचंद्र नारायण परभु कोणी त्या मसलतींत होता त्यासही धरून आणून किल्ल्यावर टाकिलें. नगरचा किल्ला कवीजंग किल्लेदार यानें पेशवे यांस अनकूल होऊन त्यांस दिला. ही खबर सलाबतजंग व निजामअल्ली यांस समजतांच त्यांनीं फौज किल्ला परत घेण्याकरितां तयार करून धारूरास पाठविली, व आपणही मागाहून सात हजार फौजेनिशी धारूराकडे निघाले. हें वर्तमान पेशवे यास कळलें. श्रीमंत व भाऊसाहेब व दादासाहेबसुध्दां स्वारीस निघाले. बरोबर फौज घेऊन निघाले. सबब उदगीरनजीक गांठले. लढाई झाली. त्यांत पेशवे यांचा कांहीं मोड झाला; परंतु छ १५ जमादिलाखर रोजीं ह्मणजे (३ फेब्रूवारी १७६०) उदगीर मुक्कामीं जी लढाई झाली, त्यांत नबाब अगदी शिकस्त होऊन दहा हत्ती व चार तोफा आल्या. शेवटीं तह होऊन पेशवे यांनीं नगर किल्ला घेतला. तो त्यांजकडे कायम राहून, शिवाय दौलताबाद व शिवनेर, जुन्नर, अशीरी व विजापूर येथील किल्ले सालेर मुल्हेर हे पेशवे यांस द्यावे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु॥ तिसा खमसैन मया व अलफ, सन ११६८ फसली,
अबलसाल छ २८ रमजान, ५ जून १७५८,
वैशाख वद्य ३० शके १६८०
दादासाहेब लाहोराहून देशीं येतांना मारवाडांत जनकोजी शिंद्याची गांठ पडली. त्यास आज्ञा केली कीं, मल्हारराव होळकर याचे भिडेनें नजीबखान याचें पारपत्य झालें नाहीं, आह्मी देशी जातों, तुह्मीं कसेंही करून त्याचें पारपत्य करावें, मारून टाकावें. असें सांगितलेनंतर पुण्याकडे येतांना दत्ताजी शिंदे लग्न उरकून उज्जनीस जात असतां त्यांची गांठ पडली. त्यांसही सदरहूप्रमाणें पारिपत्य करण्याविषयीं आज्ञा झाली. दादासाहेब दुस-याकरितां पुण्यास दाखल झाले. खंडेराव हत्ती वीज-गजाबरोबर लढण्यास आणिला. दादासाहेब देशीं आल्यावर मागाहून मल्हारजी होळकर व जनकोजीचें वांकडें पडल्यामुळें त्यास भेटण्यास आले. भेटी झाल्या. मल्हारजीनें नजीबखान याचे हातें भागीरथीस पूल बांधून सुजायतउद्दवला यावर जावें असें सांगितलें, तें जनकोजीस बरोबर वाटलें नाहीं. पुन: असें सांगितलें कीं, नजीबखान एक हिंदुस्थानांत आहे, त्याचें पारपत्य केल्यास पेशवे जासूदाबरोबर अटकेपर्यंत वसूल आणतील, मग आपण काय करावें ? असें सांगून आपला पालक पुत्र तुकोजी याजबरोबर वीस हजार फौज देऊन, शिंद्यांजवळ जाऊन, मल्हारराव देशीं आले. येतांना उज्जनीस दत्ताजी शिंद्याची गांठ पडली. त्यासही नजीबखान याचे हातें भागीरथीस पूल बांधून सुजातदवला यावर जावें, अशी मसलत दिली. ही त्यास मानवली. विठ्ठल शिवदेव यासही याप्रमाणें सांगितलें. तें दत्ताजीचे मनांत ठसलें. छ ६ तागायत छ ९ सवाल ज्येष्ठ शु.१० शुक्रवार [१३-१६ जून १७५८] पर्वतीस विष्णूची स्थापना झाली. छ १६ तागायत छ २२ रमजान [२४-३० मे १७५८] शकुन्तेश्वराची स्थापना वडगांवावर झाली. धरणीकंप शांत झाला. दादासाहेब यांची स्वारी पुळ्याच्या गणपतीस गेली होती, ती फाल्गुनांत परत आली. रंगाचा समारंभ मोठा केला. सदाशिव पेठेस नवीन वस्ती होत आहे. नारायणराव यांचें नांव नारायण पेठेस ठेविलें. पुण्यास चिरेबंदी कुसूं घालण्याचा कारखाना चालला आहे. छ २७ साबान (६ मे १७५८) सचिवपंत यांजकडे वसूल देत असतां तो सदाशिव रघुनाथ यांजकडे देणें ह्मणून कळलें व जमीनदारास पत्रें छ २० साबान [२९ एप्रिल १७५८] बयाबाई आंबेकरीण मयत झाली, चैत्र वद्य ७ गुरुवार [१९ एप्रिल १७५९]. ताई मृत्यु पावली, कार्तिक वद्य १३ रोज सोमवार [२७ नोव्हेंबर १७५८]. छ २५ रबिलाखर पर्वतीवर दरवाजास तट बांधून १८ लक्ष रुपये देकार झाला. ऐशीं हजार ब्राह्मण जमले होते. छ सवाल (१५ जून १७५८) नाना पुरंदरे व बळवंतराव मेहेंदळे यांजकडून मुतालिकी शिके परत आले. फ्रेंच लोकांनीं फोर्तसेंतदेवीद घेतलें ता. २८ एप्रिल ते पावलिक्पर्यंत घेतलें. ता. १७ फेब्रूवारी सन १७५९ इसवी. याच साली बाबाभाई राजे संस्थान परगणे हवेली नगर हमाईन वसई तालुक्यांत आला, छ २१ रज्जबचे सनदेवरून. मानाजी आंग्रे यास वजारत माआब व सरखेलपणाचीं वस्त्रें दिली होतीं. ते वारले. सबब राघोजी आंग्रे यांस वजारत माआब व सरखेची वस्त्रें दिलीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
डावघाव पाहून लढत होते. नवाबांनीं सिंधखेडास जाऊस खासा अंबारी सिंदखेडचे दरवाजाजवळ ठेऊन जाधव यास ठाण्यांतून काढून खासे अंबारींत घेऊन त्याची फौज बाहेर काढून माघारे फिरविले. त्या दिवशीं लढाईचें तोंड लागून दीड प्रहर मातबर लढाई झाली. या लढाईत दत्ताजी शिंदे यास जखम लागली होती. शेवटीं नबाब शिकस्त होऊन पंचवीस लक्षांची जहागीर पेशवे यांस देऊन सल्ला केला. नळदुर्ग किल्ला पेशवे यांनीं घेतला. विश्वासराव यांजवर निजामअल्ली व विठ्ठल सुंदर चालून आले. हें वर्तमान पुण्यांत श्रीमंतांस कळतांच भाऊसाहेबसुध्दां सफर महिन्यांत निघून नाशिकास जाऊन गंगास्नान करून नगरास फराबागेंत राहिले होते. पुढें श्रीमंत विश्वासराव यांजला कर्नाटकांत असतां छ २१ रबिलाखर रोजीं [२ जानेवारी १७५८] अंबेडनजीक भेटी होऊन त्या दिवशीं स्वारी एकत्र झाली. भगवंतराव रामखेडकर व देवजी नागनाथ वकील याचे विद्यमानें नबाब श्रीमंताचे भेटीस आले. नंतर निजाम परत आपले ठिकाणीं गेले. श्रीमंत साकरखेडल्याकडून त्र्यंबकेशराकडे रज्जब महिन्यांत [एप्रिल १७५८] गेले. या लढाईत प्रथम निजामाकडील व्यंकटराव निंबाळकर यांचे मेहुणे नागोजी माने ह्मसवडकर व जनकोजी शिंदे यांचे साडू ठार झाले. दत्ताजी माने यांचे पुत्र व्यंकटराव माने यांची बहीण जनकोजी शिंद्यास दिली होती. लढाई आटोपल्यावर जनकोजी शिंदे उज्जनीस गेले व दत्ताजी शिंदे चांभारगोंद्यास लग्नाकरिता गेले. जनकोजी शिंदे पुढें बुंदिवाड्यांत जाऊन हरगडास लागले. गुमानसिंग गिराशी पळून गेला. त्या युध्दांत बाळोजी शिंदा शिंद्याकडील पडला. खेचीवाडा, राजगड, पाटणा, बुंदिकोट, खंडण्या घेऊन जयनगर माधवसिंग याजपासून वीस लक्ष रुपये खंडणी घेऊन, उदेपूरचे राणोजी याचे राज्यांत शिरले. शिवपुरीचे गढीस लागले. तेथील राजास धरून उदेपूरचे राणोजी यांचें व त्यांचें एकत्र करून, वीस लक्ष रुपये खंड घेतला. लाहोरकडील वर्तान:- अदीनाबेग याजकडे लाहोर व मुलतानचा सुभा होता. त्यास धरावयास अबदालीचे लोक आले. तेव्हां दादासाहेब यांस अदीनाबेगानें निरोप पाठविला कीं, यासमयीं आपण माझें साहाय्य करून मुलूख आपण घ्यावा. त्याजवरून दादासाहेब यांचा तळ तेवेळेस नजीकच दिल्लीस होता, तेथून एकदम चैत्रमासी लाहोरास येऊन, अबदालीचे लोक आले होते त्यांस हांकून देऊन, त्या अदीनाबेगाकडेच लाहोर मुलतानचा सुभा कायम करून, त्याचे रक्षणाकरितां आपली कांहीं फौज तेथें ठेविली. जनकोजी शिंद्यास रजपूत लोकांकडील खंडणी घेण्याचे कामास व लाहोर येथें ठेविलेले फौजेसही कुमक करण्यास सांगितलें. माळव्याचा बंदोबस्त राखण्यास मल्हारजी होळकर व दत्ताजी शिंदे यांस ठेवून आपण पुण्याकडे परत निघाले. ते तिसा खमसैनांत दस-याकरितां परत आले. या सालीं विश्वासराव यांचे बायकोचे गर्भादान झालें. टोळधाड आली. आश्विन व॥ ४ टोक्यास व धोमास भूमिकंप झाला. ३१ आक्टोबर, त्रिचन्नापल्लीस फ्रेंच यांणीं वेढा घातला होता तो इंग्रजांनीं तोडून महमदअल्लीचा पक्ष धरिला. परगणे उदेले हा महाल जवारकर राजाकडील सरकारांत येऊन वसई तालुक्याखालीं वहिवाटीस ठेविला.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु॥ सांमान खमसैन मया व अलफ, सन ११६७ फसली,
अवलसाल छ १७ रमजान, ५ में १७५७,
ज्येष्ठ वद्य ३ शके १६७९.
सालगुदस्त श्रीमंत कर्नाटकाहून येतेसमयीं बळवंतराव गणपत मेहेंदळे यांस छावणीस ठेवून कांहीं मुलूख सर करण्यास सांगितलें होतें. त्यांणीं कर्नोल व कडपेकर नवाब याशीं लढाई करून सर केले. याजबद्दल छ ९ सफरीं (२३ अक्टोबर १७५७) पत्र आलें आहे. शिवाय हुसकोट परगणाही कडपेकराकडून घेतला, व तो नबाबही त्या संधींत मयत झाला. पुढें त्याजकडील लोकांनीं मेहेंदळ्याशीं लढाई करून मुलूख त्याचे हातीं लागूं दिला नाहीं. अर्काटचा नबाब याणें चौथाई व सरदेशमुखीबद्दल दोन लक्ष रुपये रोख व अडीच लक्ष रुपये वसुली इतका मुलूख लावून दिला. त्या नबाबानें लबाडी करून पैसा न द्यावा असें कृत्य आरंभिलें; परंतु शेवटास न जातां कराराप्रमाणें देणें भाग पडलें. पेशवे यांची स्वारी सालगुदस्त परत देशीं आल्यावर भागें ह्मैसूरचे दिवाण यांनीं खंडणीत जो मुलूख लावून दिला होता तो परत घेतला. हें वर्तमान पेशवे यांस कळतांच मेहेंदळे यांचे मदतीस गोपाळराव गोविंद पटवर्धन यांस फौज देऊन कर्नाटकांत पाठविलें. त्यांनीं मंगळुरास वेढा घातला. तेव्हां मुख्य कारभारी हैदरअल्लीखान होता. त्यानें पहिल्या कराराप्रमाणें राहिले खंडणीचा पैसा रोख व सोनें देऊन बाकी रुपयांच्या हुंड्या देऊन खंडणीचा निकाल करून आपले महाल परत घेतले. त्यांची वहिवाट करूं लागला. गोपाळराव गोविंद पुढें आणखी मद्रासेकडे गेले होते; परंतु त्यांस मोंगलाईत विश्वासराव याजबरोबर जाण्याकरितां परत बोलाविल्यावरून परत पुण्यास आले व बळवंतराव मेहेंदळेही परत आले. यांजकडील मुतालकी शिक्का छ ८ सवाल (१५ जून १७५८) तिसा खमसेनांत परत आला. छ ११ जिल्हेज रोजीं (२७ आगष्ट १७५७) विश्वासराव यांची स्वारी मोंगलांवर औरंगाबादेस निघाली. बरोबर जनकोजी व दत्ताजी शिंदे, मोरो बाबूराव व महादजी अंबाजी पुरंदरे, दमाजी गायकवाड, समशेरबहाद्दर वगैरे सरदारसुध्दां गेले. तेव्हां सलाबतजंग व बसालतजंग व निजाम अल्लीखान अवरंगाबादेस होते. त्यांशीं दोन तीन महिने लढाई चालत होती. रामचंद्र जाधवराव दोन हजार फौजेनिशीं नबाब याजकडे भालकीहून येत होते. हें कळतांच विश्वासराव यांनीं दत्ताजी शिंदे यास त्याजवर पाठविलें. तेव्हां सरकारचें ठाणें सिंधखेडास होतें. शिरले. दत्ताजी शिंदे यानीं ठाण्यास मोर्चे देऊन बसविले. तेव्हां निजामअल्ली फौजसुध्दां जाधव यास घेऊन येण्याकरितां चालले. त्याजवर खुद्द विश्वासराव चालले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
तो येतांच दिल्लीस अंताजी माणकेश्वर गीर्दनवाईवर होता, त्याजवळ फौज थोडी होती. तो पळून गेला. मग दिल्ली शहर लुटलें. बादशहास कैद केलें. दिल्लीत कत्तल करून अठरा हजार मनुष्यें मेली. कराराप्रमाणें चंदाजमानीस अबदालीचा पुत्र तेमूरशहास दिली. गाजुद्दीनखान वजीर यास कैद करून बराबर घेऊन कुरुक्षेत्रावर हल्ला केला. तें क्षेत्र लुटलें. नंतर मथुरेसही अशीच गर्दी करून गोघाटी उतरले. तेथे गाजुद्दीनखान अटकेंत असून, त्याचा डेरा यमुनेच्या कांठी होता. नदीस पाणी फार यामुळें त्या गाजुदीनखान याजवरील पहारेकरी असावध राहिले. गाजुदीनखान यास पोहता येत होतें त्यानें ती संधि पाहून यमुनेंत उडी टाकिली. पोहत पोहत सात कोस आग्रा येथें किल्लेदार याजजवळ येऊन त्यास जीव वांचविण्याविषयीं बहुत आर्जव केल्यावरून त्यास किल्लेदार यानें किल्ल्यांत घेतलें. तो किल्ला अकबर बादशहाचे वेळचा किमयेच्या द्रव्यानें बांधलेला होता. त्याजवर तोफा वगैरे लढाऊ सामान बहुत होतें. गाजुद्दीन पळाला ही खबर कळतांच अबदाली व नजीबखान आग्रा शहरावर निघाले. किल्लेदार याणें आग्रा शहरचे लोकांस ताकीद करून लोक बाहेर काढिले. अबदाली व नजीबखान आग्रा येथें दाखल होतांच किल्लेदारानें चारशें तोफांची सरबत्ती चालविली. किल्ला हातीं येणें कठीण. गाजुद्दीन याजवर प्रसंग पडला याजमुळें पेशवे फौजेसुध्दा व मल्हारजी होळकर इकडे येण्यास निघून नर्मदापार येत आहे अशी खबर ऐकून अबदाली वगैरे फौज तेथून परतून कुंभेरीस सुरजमल्ल जाटावर गेले. पेशवे यांची फौज येत आहे, यामुळें विशेष तसदी न देतां दहा लक्ष रुपये खंडणी घेऊन दिल्लीस आले. नजीबखान याचे विश्वासावर येथें राहणें बरोबर नाहीं, ह्मणून फक्त पांच हजार फौज नजीबखान याजपाशी दिली. ती ठेवून पेस्तर बंदोबस्त पाहूं असें पानावर पान टाकून अबदाली सरदेस येऊन तेथें समदखान मताबखान याजपाशीं दहा हजार फौज व मलका जमानी व चंदा जमानी व तेमुरशा यांजपाशी वीस हजार फौज ठेवून आपण कंदाहारास गेला. मागाहून दादासाहेब मोठमोठया मजला करीत आग्रा येथें जाऊन, गाजुद्दीन यास सोडवून घेऊन दिल्लीस गेले. नजीबखान दिल्ली किल्ल्यांत कोंडला. नंतर तो मल्हारजी होळकर यास शरण आला. होळकर याचे भिडेस्तव त्यास होळकर याचे जिमेस दिला. आलमशा बादशहास पुन्हा दिल्लीतक्तावर बसवून अंताजी माणकेश्वरास गीर्दनवाई सांगितली. नंतर कुरुक्षेत्रास येऊन सरदेस जाऊन समदखान यास लुटून फस्त केला. पुढें लाहोरास गेले. तैमुरशा पळून गेला. फौज लुटली. तेथील सुभा पूर्वी संदीपबेग होता. याचा पुत्र दुराणीनें मारला. स्त्री पुत्र अटकेंत होतीं. तीं सोडून त्यास चाकरीस ठेवून पांच हजार फौज देऊन त्याजकडे सुभा सांगितला. त्याचा कारभारी कायस्थ लक्ष्मीनारायण होता. मल्हारजी होळकर यांणीं नजीबखानाचें अगत्य धरून त्यास आपलेतर्फे अंतर्वेद प्रांत कुरुक्षेत्रापासून कुंजपुरादेखील चाळीस लक्षांची मामलत त्याचे स्वाधीन केली. २१ जुलई सन १७५६ सुराजउद्दवला मुर्शिदाबादेहून येऊन कलकत्ता शहर व किल्ला घेतला. गव्हर्नर व कमांडर चीफ् पळून गेले. १४६ इंग्रज २० फुटांचे कोठडींत कोंडले होते. २० जून रोजीं १२३ मेले. बंगाल, बहार व ओरिसा अल्लीवर्दीखान याजकडे होते. तो मेला. सन १७५६ त त्याचा नातू सुराजउद्दवला गादीवर बसला. १ फेब्रूवारी सन १७५७ सुराजउद्दवला व क्लैव्ह साहेब यांचा तह झाला. क्लाइव्ह साहेबानें कलकत्ता घेतला. २ जानेवारी सन १७५७. फ्रेंचांचे चंद्रनगर घेतलें, ६ फेब्रूवारी सन १७५७.