Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
काढून लावणें [ क्राथयित्वा लापयते = काढून लावतो (हकालतो). लापयते is defeated]
काणेली [ कन्या = कण्णा = काणा = काणेली ] काणेलीमातर् म्ह० तो ज्याची आई कन्या आहे. (भा. इ. १८३२)
कात [कर्त् १० शैथिल्ये. कर्तय = कात ] ( धा. सा. श. )
कात (सापाची ) १ [ कृत्ति = कत्ति = काति = कात ] डें-डी प्रत्यय लागून कातडें-डी. (भा. इ. १८३२)
-२ [ कृत्ति = कत्ती = कांती = कात (स्त्रीलिंगी) ] कृत्ति शब्दाचा मूळ अर्थ कातडें कोणत्याहि जनावराचें. मराठींत साप वगैरे प्राण्यांच्या कातड्याला कात म्हणतात. ( ग्रंथमाला)
कांतडे [ कृत्ति = कात्ति = कात = कातडें = कांतडें ] ( स. मं.)
कातकरी [कात्कृ to insult कात्करि: = कातकरी ] a low tribe of savages to be insulted unceremoniously.
कातर [ कत्र् १० शैथिल्ये. कत्रय = कातर ] ( धा. सा. श. )
काथवट [ काष्टपात्र, काष्टपात्री = काथवट, काठवट ]
कांदळ १ [ कंदर (गुहांतील मूर्ति ) = कांदळ ] महाराष्ट्रांत मोडक्या देवळांच्या पुढें हे दगड असतात. यांवर लिंग व त्याचे उपासक कोरलेले असतात.
-२ [ कंदल = कांदळ ] महाराष्ट्रांत जुन्या देवालयांभोंवतीं लढाईचीं चित्रें दगडावर कोरून मांडलेलीं असतात. त्या दगडी चित्रांना कांदळाचे दगड म्हणतात. हीं चित्रें वीर, सती, घोडेस्वार, भालेवाले इत्यादींचीं असतात. कंदल म्ह० लढाई, कांदळ म्ह० लढाईसंबंधी.
कांदा ( अकलेचा ) [ कंद = काँदा. कंद म्ह० गड्डा ] (भा. इ. १८३४)
कान [ कर्ण्ण = कान] (स. मं.)
कानकीट [ कर्णकिट्टं = कानकीट (कानांतला मळ ) ] (भा. इ.१८३६)
कानकुडें [ कर्णकुंडलं = कण्णकुड्डळ = कानकुडें ] (भा. इ. १८३४)
कानटाळ [कर्णताळ = कण्णटाल = कानटाळ] (भा. इ. १८३६)
कानड ( डा-डी-डें ) [कर्णकटु = कण्णअडु =काणाडु कानाड = कानड ( डा-डी-डें ) ] कानडें म्हणजे कर्णकटु. ( भा. इ. १८३६)