Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

सुना-नी-नें [ सून (रिकामा ) = सुना-नी-नें ]

सुनावणी [ संज्ञापना = सण्णावणा = सनावणी = सुनावणी अ बद्दल उ]

सुपडें [ शूर्पपुटं ] ( सुपलें पहा)

सुपली [ शर्पपुटिका = सुपली ] (सुपलें पहा)

सुपलें [ शर्पपुटं = सुपड़ें, सुपलें. शूर्पपुटिका = सुपली ]

सुफराट, सुफराटें [ सुस्फारयत् ] (उपराट पहा )

सुंब [ शुल्ब ] (सुंभ पहा)

सुबक [ सुभगं = सुवक ]
सुभगं उक्तं त्वया = तूं सुबक बोललास.

सुंभ [ शुल्बं वराटकं स्त्री तु रज्जु स्त्रिषु वटी गुणः ॥ २७ ॥
( अमर-द्वितीय कांड-शद्रवर्ग).
शुल्ब = सुब्ब = सुंब = सुंभ ( दोर ) अनुनासिक आगंतुक ] (भा. इ. १८३३)

सुमार १ [ स्मृ १ स्मृतौ, to recollect = सुमार ]
त्याला सुमार राहिला नाहीं म्हणजे आठवण राहिली नाही.

-२ [ सुकुमार = सुउमार = सुमार ] पाहिली, मुलगी सुमार आहे, येथें सुमार म्हणजे सुकुमार, अल्पतनु, लहान मुलाच्या मानानें कोवळी असा अर्थ आहे.

सुर् (sur-round) [ सम्परि = सुर्. circharge. sub पासून सर काढणें अयुक्त. ]

सुरगांठ [ सूद्ग्रंथिः = सुर्गांठ. निर्ग्रंथिः = निर्गाठ.]

सुरपाटी [सृपाटी = सुरपाटी ] सृपाटी म्हणजे माप, मर्यादा. सुरपाटी म्हणजे मापाची, मर्यादेची रेघ.
आट्यापाट्यांतील मधली मेजाची मुख्य पाटी.

सुरवाड [ सुवृद्धिः = सुरवाड ] (ज्ञा. अ. ९ पृ. १८२)

सुरवाडणें [ सुवर्धनं = सुवङ्ढण = सुरवाडणें ] निर्वर्धनं = निर्वङ्ढण = निरवाडणें. निरच्या धर्तीवर सुर् ] (भा. इ. १८३२)

सुरवाडु [ श्रुतिवादः ] (ज्ञा. अ. ९ पृ. ४०)

सुरसुरणें [ शूर् १० विक्रान्तौ. शूरशूरयं = सुरसुर सुरसुरणें = आंगीं पराक्रम येण्याची धमक येणें. ( धा. सा. श. )

सुरा [ सुरा चषकमद्ययोः (मेदिनी)] पाणी प्यायचा. (भा. इ. १८३३)

सुरू [सुर (द्रुम) = सुरू ] वृक्षविशेष, देवदाराचा प्रकार

सुरू करणें [श्रु १ श्रवणे. श्रुकरणं = सुरू करणें] काल व्याकरण सुरू केलें. ( धा. सा. श.)