Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

बोडका १ [ मस्करिन् (यति ) = बोडका = फजिती ]

-२ [ व्युदक = बोडका - बोडकें ( तळें वगैरे ज्यांत पाणी नाहीं तें) ] बोडक्याचें भात = व्युदकीयाः तंडुला:

बोडका - की [ वुड् (त्यागणें) पासून बोडका-की ] ज्यांनीं केस किंवा अलंकार त्यागिले आहेत त्या व्यक्ति. (स.मं.)

बोडकिच्चा [ वार्धकिनेयः = बोडकिच्चा ]

बोडकी [ वर्धकी (वेश्या, जारिणी) = बोडकी ]

बोडकें १ [ मुंडकं = बोडकें ]

-२ [ मूर्धकं = वूढकँ = बोडकें (मस्तक) ]

-३ [ मूर्धन् + क = मूर्धक pate = बोडकें pate ]

बोडक्याचें (भात) [ मुंडकशालि: = बुंडक = बोडक. मुंडकीय = बोडक्याचें (भात) ]

बोडण १ - नित्य जे वार्षिक कुलाचार व नैमित्तिक जे विवाहादि संस्कार ह्यांच्या प्रारंभीं किंवा अंतीं बोडण भरण्याची चाल कोंकणस्थांत आहे. बोडण भरणें म्हणजे कोणत्याहि शुभ धातूची देवीची प्रतिमा किंवा प्रतीक घेऊन तिला अन्नाचे, प्रायः कणकेचे अलंकार घालून, अन्नाचा प्रायः दहीदुधाचा अभिपेक करून, अन्नाचा म्हणजे पुरणाचा नैवेद्य दाखविणें. नैवेद्य दाखविल्यावर, मूर्तीसुद्धां सर्व संभार सुवासिनी एकत्र कालवितात आणि शेवटीं उत्तरपूजेकरितां प्रतिमा काढून घेऊन, नंतर त्या कालविलेल्या संभारांतून भोजनास आलेल्या सर्व कुलस्त्रियांस, कुलपुरुषांस व कुलबालकांस प्रसाद वांटतात. असा हा वोडणाचा विधि आहे. हा विधि श्रुतिस्मृतिशास्रोक्त नाहीं, तंत्रोक्त आहे. गोपीनाथ दीक्षित ओक यांनीं शक १६८७ त समाप्त केलेल्या संस्काररत्नमाला नामक ग्रंथांत, हा बोडणाचा कुलाचार सांगितला आहे. हा संस्काररत्नमालाग्रंथ आनंदाश्रमसंस्कृतग्रंथावलींत छापून आलेला आहे. त्याच्या २६५ व्या पृष्टावर गोपीनाथ दीक्षित म्हणतात -
" यदि मोटनाचारश्चेत् सोपि कार्यः । तच्चमोटनं उक्तं मेरुतंत्रे -

अथ मोटनकं वक्ष्ये देवाविर्भावकारणं ।
पाकक्रिया प्रकर्तव्या चतुर्भक्ष्यसमन्विता ।।
भार्यया साधकेन्द्रस्य पतिव्रत्यादियुक्तया ।
अप्रसूताः स्त्रियः पंच आहूय सुकुमारिकः ।।
अलंकृता: पवित्रास्ता एकदंबत्योपवेशयेत् ।
तत्रादौ विघ्नपत्थानमोत्रे तु वटुकस्य च ।।
चकारात्कुलदेवतायाः
ताः संपूज्य महापात्रे पवित्रे तत्र चार्पयेत् ।
क्रमाद्द्विगुणमानेन मध्वाज्ये च सितादधि ॥
दुग्धं च निक्षिपेत्तत्र नैवेद्यं तत्र निक्षिपेत् ।
कुमारिकायाहस्तेन मन्थयेयुः स्त्रिय श्च तत् ॥
स्त्रीभि स्तस्मिन् मध्यमाने देवावेशः प्रजायते ।
देवावेशे जायमाने सुगंधो वाति मारुतः ॥
सर्वे मनोगतं वक्ति देवताशु प्रसीदति ।
सिध्यंति सर्वकार्याणि मोटनानां शतेन.च ॥
नखै र्भवेद्विवाहस्तु पंचाशद्भिः सुतस्तथा ।
नखै र्विशैरित्यर्थः । पंचाशद्भिः सुतलाभ इत्यर्थः ।
अशीत्या गतराज्याप्ति विशत्या लभते धनम् ।
अष्टोत्तरशतेनापि असाध्येन तु मेलयेत् ॥
कौमारिका चेष्टदेवं कौमार्या ईरितो विधिः । इति।
कौमारी योगेश्वरी । तदुद्देशेन विधिर्भवतीत्यर्थः ।

सैंपाक करावा, पांच अप्रसूत स्त्रिया पांच कोंवारणींसह बोलवाव्या, जोगेश्वरीची प्रतिमा घ्यावी, मोठी परात घ्यावी, तींत मध, धूप , साखर, दहीं, दूध, व नैवेद्य घालावा व त्या स्त्रिया व कोंवारणी ह्यांच्याकडून तो संभार कालवावा. कालवतांना देवी अंगांत येते व सर्व मनोगत बोलते. शंभर बोडणांनीं सर्व कार्ये सिद्ध होतात. वीस बडणांनीं लग्न होतें. पन्नासांनीं पुत्र होतो. ऐशींनीं गतराज्य मिळतें. विसांनीं धनसंपत्ति मिळते. अष्टोदर्शांनीं असाध्यसिद्धि होते.

असा हा मेरुतंत्रोक्त विधि आहे. कित्येक तंत्रोक्तविधि श्रुतिस्मृत्युक्त असतात. त्यांपैकीं हाहि विधि कदाचित् असेल.
मोटन = वोडण = बोडण

गोपीनाथ दीक्षित कोंकणस्थ पडले. तेव्हां त्यांनीं ह्या आचाराचा उल्लेख केला. नारायण दीक्षितादि देशस्थ धर्मशास्त्रकार ह्या विधीचा उल्लेख करीत नाहींत. गोपीनाथ दीक्षित ओक आनंदीबाई पेशवीण इचे संबंधी होते म्हणतात.

विघ्नांचें मोटन ऊर्फ बोडण ज्या आचारानें होतें त्या आचाराचें नांव बोडण.

ज्या आचारांत अन्नादि संभार मोडून चूर्ण करावयाचा असतो तो बोडणविधि होय. (भा. इ. प्रथम संमेलनवृत्त)

-२ [ ओदन = वोडण = बोडण ] बोडण भरणें. बोडण म्हणजे कुलधर्मांत अन्न बायका कालवून मळतात तें. (भा. इ. १८३३)

-३ [ बहूदनं (षड्रस अन्न ) = बोडण ]
देवीचें बोडण भरणें म्हणजे देवीला षड्रस अन्नाचा नैवेद्य दाखविणें.

-४ [ वि + अवदान = बोडण ] Gift of food to deity.

-५ [ अवदान ] (बोडाण पहा)